तुळजाभवानी मंदिरात महिलांच्या हस्ते पूजा करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोर्हे यांनी केली.
मुंबई - तुळजाभवानी मंदिरात महिलांच्या हस्ते पूजा करण्याबाबत स्थानिक भोपे पुजारी कुटुंबातील महिलांची भावना लक्षात घेऊन याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोर्हे यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात काही विषयांवर स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या सूचना आणि तक्रारीच्या आधारावर नीलम गोर्हे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवदेनाद्वारे हि मागणी केली आहे.
मंदिरात सध्या प्रचलित असलेल्या नियमात आणि प्रथांमध्ये अनेक सुधारणा करणे आवश्यक असून, मंदिर गाभारा प्रवेश व दर्शन नियम सर्वांना समान असावेत. महिलांना गाभारा प्रवेश पूर्वीप्रमाणेच चालू ठेवावा, अशी मागणी गोर्हे यांनी केली आहे. तसेच स्थानिक पुजारी भोपे कुटुंबियांच्या महिला प्रतिनिधींना या मंदिरात पूजा करण्याबाबत त्यांनी केलेल्या मागणीनुसार परवानगी देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
यासोबत पूर्वापार चालत आलेल्या सर्व परंपरा व पुजा, नित्योपचार, त्यांचे हक्क यामध्ये भाविक, अभ्यासक यांना विश्वासात घेतल्याशिवाय बदल करण्यात येऊ नये, असा सल्लाही गोर्हे यांनी निवदेनाच्या माध्यमातून दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.