Tushar Bhosale: त्र्यंबकेश्वर वादावर तुषार भोसलेंनी उकरुन काढला नवा वाद; आरोपीबाबत केला मोठा दावा

संजय राऊत यांचा दावा खोडून काढत केले अनेक गंभीर आरोप
Tushar Bhosale: त्र्यंबकेश्वर वादावर तुषार भोसलेंनी उकरुन काढला नवा वाद; आरोपीबाबत केला मोठा दावा
Updated on

मुंबई : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाच्या वादावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी नवा वाद उकरुन काढला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा खोडून काढत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. तसेच या संदर्भातील नवे पुरावे आपण एसआयटीकडे देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Tushar Bhosale created new controversy on Trimbakeshwar temple row big claim was made about accused)

Tushar Bhosale: त्र्यंबकेश्वर वादावर तुषार भोसलेंनी उकरुन काढला नवा वाद; आरोपीबाबत केला मोठा दावा
Marriage News: भर मंडपातून पळून गेला नवरदेव! नवरीनं पाठलाग करुन पकडलं अन्...; वाचा अजब लग्नाची गजब गोष्ट

तुषार भोसले यांनी म्हटलं की, "संजय राऊत यांनी अशी भूमिका मांडली की त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची धूप दाखवण्याची शंभर वर्षांची परंपरा आहे. मग महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी तिच रीघ पुढे रेटली. याचा पुरावा देताना अनेक माध्यमातून स्थानिक शांतता समितीची एक पत्रकार परिषद दाखवली गेली. यामध्ये त्यांनी म्हटलंय की ही परंपरा जुनी आहे.

पण माझं आजही चॅलेंज आहे की ती पत्रकार परिषद नीट ऐकली तर त्यात म्हटलं की ही परंपरा जुनी आहे पण चौकाथ धुप दाखवण्याची परंपरा आहे. पण यावेळी ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर का गेले हे आम्हाला कळलं नाह. त्यामुळं संजय राऊतांचे दात घशात घालण्याचं काम केलं आहे. म्हणून राऊतांना माझं आव्हान आहे की त्यांनी धूप मंदिरात दाखवण्याची कोणती परंपरा आहे"

Tushar Bhosale: त्र्यंबकेश्वर वादावर तुषार भोसलेंनी उकरुन काढला नवा वाद; आरोपीबाबत केला मोठा दावा
Kerala Bomb News: केरळात मोठ्या हल्ल्याचा कट उधळला! उच्च क्षमतेचे 8 बॉम्ब जप्त

व्हिडिओ सादर करत आरोपीवर केले गंभीर आरोप

दरम्यान, यावेळी तुषार भोसले यांनी एक व्हिडिओ दाखवला. त्यानंतर त्यांनी दावा केला की, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धूप दाखवतानाचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे. त्यात तो व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीनं दावा केला की मागच्या वर्षी आम्ही मंदिरात गेलो होतो तर मग आत्ता आम्हाला का अडवण्यात आलं.

पण ही व्यक्ती त्र्यंबकेश्वर वाद प्रकरणात ज्या चार लोकांवर गुन्हा दाखल झाला त्यातील हा एक मुख्य आरोपी आहे. हा आरोप सलमान सय्यद एक गुन्हेगार असून त्यानं एका अल्पवयीन हिंदु मुलीचं लैंगिक शोषण केलं आहे. त्याच्यावर २०१८ मध्ये पोक्सोसह विविध गुन्हेगारी कलमं दाखल आहेत. या व्यक्तीवर नाशिकच्या कोर्टात खटला सुरु आहे.

याची सगळी माहिती एसआयटीकडं देण्यात येणार आहे. या उरुस आयोजकांमध्ये जे लोक सहभागी होते ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांपैकी ड्रग्ज सप्लायर, हत्यारांचे पुरवठादार आहेत. याची खात्री करण्यासाठी सगळी माहिती एसआयटीकडं देण्यात येणार आहे.

Tushar Bhosale: त्र्यंबकेश्वर वादावर तुषार भोसलेंनी उकरुन काढला नवा वाद; आरोपीबाबत केला मोठा दावा
RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...

राऊत हे जिहाद्यांचे एजंट आहेत का?

पण या प्रकरणाला वेगळ वळणं देत हा सलोखा, १०० वर्षांची परंपरा असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. त्यामुळं माझा त्यांना प्रश्न आहे की, आयएसआयच्या एजंटला लाजवेल असं कृत्य संजय राऊतांनी केलं आहे. राऊत हे जिहाद्यांचे एजंट आहेत का? असा आरोपही त्यांनी केला.

आमच्या गावात मंदिरात धुप दाखवण्याची कुठलीही परंपरा नाही, अशी मोहिम त्र्यंबकेश्वरवासियांनी एक स्वाक्षरी मोहिम चालवली आहे. याची माहिती देखील एसआयटीला देण्यात येणार असल्याचं तुषार भोसले यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.