Maratha Reservation : तुषार दोशींची तीनच दिवसांत पुन्हा बदली; मिळाली 'ही' जबाबदारी

tushar doshi
tushar doshiesakal
Updated on

पुणेः जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची पुण्यात सीआयडीमध्ये बदली झाली होती. आता पुन्हा त्यांची बदली झालीय.

'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार तुषार दोशी यांची रेल्वे पोलिस विभागात पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. लोहमार्ग एसपी म्हणून बदली झाल्याचं वृत्त आहे. अवघ्या तीनच दिवसांमध्ये दोशींची पुन्हा बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

tushar doshi
NCP Crisis: शरद पवार गटाने EC मध्ये संपूर्ण इतिहास सांगितला! मात्र अजित पवार गटाकडे दोन पॉवरफुल मुद्दे

१ सप्टेंबर रोजी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर आरोप झाले. त्यानंतर जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती. त्यांच्याकडे पुणे सीआयडीचं अधीक्षकपद देण्यात आलेलं होतं.

दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तुषार दोशींच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत दोशींना बदली देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती.

tushar doshi
Political Crisis : ''युक्तिवादामध्ये दम नसल्यामुळे वेळकाढूपणा'', सुनावणी संपल्यानंतर तटकरेंची प्रतिक्रिया

मात्र दोशींनी सीआयडीचा पदभार घेण्यापूर्वीच त्यांनी तीनच दिवसांमध्ये बदली झाली आहे. सरकारमध्ये मराठा आरक्षणावरुन दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. छगन भुजबळ जाहीरपणे सरकारवर नाराजी व्यक्त करत आहेत. तर दोशींच्या बदलीला दीपक केसरकर विरोध करत आहेत. त्यामुळे नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.