बारावीचा निकाल ९४.२२ टक्के

फेब्रुवारी - मार्च २०२० च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला
12 th result
12 th resultSakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. फेब्रुवारी - मार्च २०२० च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ४९ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १४, ४९,६६४

एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी - १४,३९,७३१

एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १३,५६,६०४

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९३.२९

एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी - ९५.३५

निकालाची वैशिष्ट्ये

सर्वाधिक निकाल कोकण विभाग - ९७.२१ टक्के

सर्वात कमी निकाल मुंबई विभाग - ९०.९१ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल - ९५.२४ टक्के

शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखा - ९८.३०टक्के

वाणिज्य शाखा - ९०.५१ टक्के

कला शाखा - ९१.७१टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम - ९२.४० टक्के

विभागनिहाय टक्केवारी

कोकण - ९७.२१ टक्के

पुणे- ९३.६१ टक्के

नागपूर - ९६.५२ टक्के

औरंगाबाद - ९४.९७टक्के

मुंबई- ९०.९१ टक्के

कोल्हापूर -९५.०७ टक्के

अमरावती - ९६.३४ टक्के

नाशिक - ९५.२५ टक्के

लातूर - ९५.२५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.