बारावीचा निकाल ७ जूनला? चित्रकलेच्या गुणांमुळे लांबणार दहावीचा निकाल

७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. पण, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिक्षणमंत्री स्वत: तारीख जाहीर करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मुलांची चित्रकलेची परीक्षा उशिरा झाल्याने त्यांचा निकाल २० जूनपर्यंत लागू शकतो, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.
 Maharashtra SSC HSC Results News
Maharashtra SSC HSC Results Newssakal
Updated on

सोलापूर : राज्यातील बारावीच्या मुलांच्या निकालाची तयारी आता बोर्डाकडून अंतिम टप्प्यात आली आहे. ७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. पण, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिक्षणमंत्री स्वत: तारीख जाहीर करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मुलांची चित्रकलेची परीक्षा उशिरा झाल्याने त्यांचा निकाल २० जूनपर्यंत लागू शकतो, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.(Maharashtra SSC, HSC Results News)

 Maharashtra SSC HSC Results News
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा पार पडली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ठोस नियोजन केले. मुलांना वाढीव वेळ देण्यात आला होता. ‘गाव तेथे परीक्षा केंद्र’अंतर्गत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यात आली. कोरोनाच्या धास्तीत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे आता निकालाकडे लक्ष लागले आहे. सुरवातीला बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असून सध्या तो पूर्ण झाला आहे. उत्तीर्ण मुलांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने ७ जूनला निकाल लावला जाणार आहे. तर दहावीचा निकाल थोडा विलंबाने जाहीर केला जाणार आहे. दहावीच्या मुलांना चित्रकलेचे तीन, पाच किंवा सात गुण दिले जातात. ते गुण त्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमध्ये गणले जातात. या पार्श्वभूमीवर ६ जूनपर्यंत विभागीय मंडळांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाकडे पाठवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या गुणांची गोळाबेरीज करून दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे. कोरोनाच्या संकटात देखील बारावीच्या १४ लाख तर दहावीतील १७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

 Maharashtra SSC HSC Results News
सरकारमध्ये २.७२ लाख पदे रिक्त! दोन टप्प्यात होणार मेगाभरती
  • निकालाच्या तारखेवरून

  • शिक्षणमंत्री-राज्यमंत्र्यांमध्ये चढाओढ

शिक्षण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बच्चू कडू यांनी शालेय शिक्षण विभागाला विविध विषयांवर निर्णय घेण्यासंदर्भात ढिगभर पत्रे पाठविली. पण, ना शिक्षण सेवकांचा कालावधी कमी झाला ना त्यांचे शिक्षण सेवक काळातील वेतन वाढले. नवीन शिक्षक भरती संदर्भातही त्यांनी अनेकदा सूचना केल्या, पण त्यावर काहीच ठोस कार्यवाही झाली नाही. आता दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार हे दरवर्षी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तारीख जाहीर करतात. पण, आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही त्यावर भाष्य केले आहे. पण, शेवटी शिक्षणमंत्री जी तारीख निश्चित करतील, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

 Maharashtra SSC HSC Results News
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जूनअखेर मिळणार १० हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान

निकालानंतरच अकरावी प्रवेश

पुणे, नाशिक, मुंबई अशा पाच जिल्ह्यांमध्येच सध्या अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. ज्या ठिकाणी ऑनलाइनची सुविधा आहे, तेथील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु करण्यात आली. पण, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी प्रत्येक कॉलेज स्तरावर ऑफलाइन प्रवेश सुरु होतील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.