इगतपुरी-कसारा दरम्यान मालगाडीचे सात डब्बे रुळांवरुन घसरले; मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीचे तीनतेरा !

coaches of a goods train derailed near Kasara
coaches of a goods train derailed near Kasara
Updated on

मुंबई: मध्य रेल्वेच्या इगतपुरी ते कसारा दरम्यान एका मालगाडीचे सात डब्बे रुळांवरुन घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मुंबईतून बाहेर गावी जाणाऱ्या लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे. या अपघातानंतर सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस आणि सीएसएमटी- आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेससह अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या आहेत.

रविवारी संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांच्या सुमारास इगतपुरी ते कसारा स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर एक मालगाडीच्या अपघात घडला आहे. एकुण ४५ डब्याची मालगाडीचे सात डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले.यामुळे इगतपुरी ते कसारा स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे अभियांत्रिकी पथकांने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तात्काळ कल्याण येथून अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन पाठविण्यात आल्या. घसरलेले डब्बे रुळांवरुन बाजूला काढण्याचे आणि रुळ दुरुस्तीचे काम तात्कळ हाती घेण्यात आले. विशेष म्हणजे या अपघातामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान अँप मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाहीत. तसेच उपनगरातील लोकल सेवांवर परिणाम झालेला नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

मेल-एक्सप्रेस गाड्या रखडल्या -

मध्य रेल्वेच्या इगतपुरी ते कसारा दरम्यान एका मालगाडीच्या अपघातामुळे मुंबईतून जाणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्याना मोठा फटका बसला आहे. रेल्वे मार्गारील घसरले डबे बाजूला काढण्याचे काम रेल्वेने हाती घेतले असले तरी, रात्री मुंबईतून जाणाऱ्या सीएसएमटी हावडा एक्स्प्रेस,सीएसएमटी आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस, सीएसएमटी - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, पंजाब मेल एक्स्प्रेस, प्रतापगड एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

coaches of a goods train derailed near Kasara
Haitham bin Tariq: ओमानचे सुलतान भारतात येणार, पहिलीच राजकीय भेट; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा!

घटनेच्या चौकशीचे आदेश-

या अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहे. या अपघातामुळे मेल-एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे मार्ग मोकळा करण्यासाठी रेल्वेचे अभियांत्रिकी पथक युद्धपातळीवर घसरलेले डबे रेल्वे रुळावरून बाजूला करण्याचे काम करत आहेत.

रेल्वे गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या -

मालगाडीच्या अपघातानंतर ट्रेन १७६१२ सीएसएमटी नांदेड एक्सप्रेसला कल्याण-कर्जत-पुणे-दौंड-लातूर मार्गे मार्गे वळविण्यात आली आहे. तर,ट्रेन क्रमांक १२१०५ सीएसएमटी गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला कल्याण - पुणे - दौंड - मनमाड मार्गे वळवली, ट्रेन क्रमांक १२१३७ सीएसएमटी-फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेसला दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे आणि ट्रेन क्रमांक १२२८९ सीएसएमटी नागपूर दुरांतो एक्स्प्रेसला दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे वळविण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

coaches of a goods train derailed near Kasara
Sanjay Raut : संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक; कुठे घडली घटना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.