Uday Samant car attack: पुणे पोलिस म्हणतात, सामंतांनी जर आमचं ऐकलं असतं तर..

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली
Uday Samant attack case
Uday Samant attack caseesakal
Updated on

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणात शिवसेनाप्रमुख संजय मोरेंसह चारजणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.(Uday Samant attack case pune shiv sena pune police clarification)

Uday Samant attack case
'सोज्वळ चेहऱ्यामागचे प्रकार...'; हल्ल्यानंतर सामंतांचा ठाकरेंवर प्रहार

मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यासाठी रुट ठरवून दिला होता. मात्र, उदय सामंतांनी तो रुट फॉलो केला नाही. पोलासांनी ठरवून दिलेल्या रुटने उदय सामंत गेले नाहीत. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

जिथे घटना घडली तो कॉन्व्हे रूट नव्हता. उदय सामंत यांची गाडी एकनाथ शिंदे यांच्या कॉन्व्हेच्या मागे राहिली म्हणून त्यांनी शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला आणि ते त्या सभेच्या जवळ पोहचले. सभा सुटायला आणि गाडी यायला एकच वेळ झाली. असे स्पष्टीकरण कळसकर यांनी दिले आहे.

तसेच, या हल्ल्याप्रकरणी आठ ते दहा आरोपी असल्याचे नाव समोर आलेली आहेत यातील सहा आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस पुढील तपास करत आहे. संभाजी थोरवे, सुरज लोखंडे, संजय मोरे, बबन थोरात आणि इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बबन थोरात यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहितीही कळसकर यांनी दिली आहे.

Uday Samant attack case
मला राज्यात शांतता हवीय; सामंतांच्या हल्ल्यानंतर CM शिंदेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांचा गाडीवर हल्ला केला आहे. गद्दार-गद्दार असं म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान कात्रज भागात आज आदित्य ठाकरे यांची सभा होती. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला.

या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.