सामंतांवरील हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढणार

uday samant attcak security of mlas from shinde group will be increased
uday samant attcak security of mlas from shinde group will be increased esakal
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. काल पुण्यातील कात्रज परीसरात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला केला होता. सामंत हे तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला होता. दरम्यान या हल्ल्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना आधीच वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीय. आता त्या सुरक्षेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त आणि राज्य पोलिस महासंचालकांना या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.

याप्रकरणी बंडखोर नेते माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुखांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजित करणारे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांचा देखील समावेश आहे. खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कलमांनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी मंगळवारी रात्री पोलीस तक्रार दिली होती.

uday samant attcak security of mlas from shinde group will be increased
शिवसेना-शिंदे गटाचा वाद 'व्हॉट्सऍप लेव्हल'वर; नीलम गोऱ्हेंना ग्रुपमधून काढलं

मंगळवारी रात्री कात्रज येथे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर कात्रज चौकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मार्गस्थ झाला. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा शंकर महाराज मठाकडे गेल्यानंतर सामंत यांची गाडी कात्रज चौकात सिग्नल लागल्याने थांबली. सामंत यांना गाडीत पाहताच, जमावाने ‘‘गद्दार गद्दार...’’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली. जमावाने सामंत यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न करत गाडीवर हाताने, चपलांनी मारण्यास सुरवात केली.

हाताच्या जोरदार ठोशांमुळे सामंत यांच्या गाडीची काच फुटली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान सौम्य लाठीमार करून जमावाला बाजूला काढले आणि सामंत यांची वाट मोकळी करून दिली. या हल्ल्यानंतर सामंत हे थेट कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन तेथे त्यांनी तक्रार दिली.

uday samant attcak security of mlas from shinde group will be increased
शहाजी पाटलांकडून शरद पवाराचं कौतुक अन् उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.