Uday Samant: दाओस दौऱ्यासाठी इतक्या लोकांची गरज काय? आदित्य ठाकरेंच्या सवालाला सामंतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, जरा...

दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० जणांचं शिष्टमंडळ जाणार आहे.
Aditya Thackeray vs Uday Samant
Aditya Thackeray vs Uday Samant esakal
Updated on

मुंबई : दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० जणांचं शिष्टमंडळ जाणार असल्याचा आरोप करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. इतक्या लोकांचं दाओसला काय काम आहे? असा सवाल विचारत याचा हिशोबही सरकारकडं मागितला आहे. यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच थोडा धीर धरा असा सल्लाही दिला आहे. (Uday Samant gives answer to Aditya Thackeray question raised on CM Eknath Shinde Daos tour)

Aditya Thackeray vs Uday Samant
Thackeray Vs Narvekar: अजून खेळ संपलेला नाही! नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

२० जणांहून अधिक लोकांचं शिष्यमंडळ

दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि २० जणांचं शिष्टमंडळ जाणार आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) आरोपांना उत्तर दिलं. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासन दिलं की या दौऱ्याचा संपूर्ण खर्चाचा तपशील दिला जाईल. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महाराष्ट्राच्यादृष्टीनं ऐतिहासिक ठरेल. वेदांता फॉक्सकॉन आम्ही कधी घालवला नव्हता पण तो घालवल्याचा आरोप आमच्यावर झाला. पण याच्यापलिकडे जाऊन बाहेरचे उद्योजक आणण्याची महाराष्ट्राची ताकद या दौऱ्यातून कळेल.

Aditya Thackeray vs Uday Samant
Surat Attack : सुरत हल्ला अन् इंग्रजांचे साम्राज्य वाढवणारा तो अधिकारी! राज ठाकरेंनी उल्लेख केलेला तो जॉर्ज ऑक्झेंडन कोण?

शिष्टमंडळाक कोण असणार?

एमआयडीसीचं १४ लोकांचं शिष्टमंडळ, एमएमआरडीएचं ५ लोकांचं शिष्यमंडळ आहे हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी ३ लोकांचं शिष्टमंडळ सध्या तिथं स्वखर्चातून गेलं आहे. यावर कोणाचा आक्षेप घेण्याचं कारण काय? महाराष्ट्रासाठी जर जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी शासनातील काही लोक स्वतःच्या खिशातून खर्च करत असतील तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही.  (Latest Maharashtra News)

काही माजी खासदार तिथं गेलेत असं मी पत्रकार परिषदेतून ऐकलं पण माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी २१ तारखेपर्यंत थांबलं पाहिजे. नेमका खर्च किती झाला किती होणार आहे, हे सर्व पाहिलं पाहिजे. आम्ही माहिती दिल्यानंतर परत ते माहितीच्या अधिकाराखाली माहिती घ्यायला जातीलच. पण जनतेच्या हे लक्षात येईल की, यावेळचा दाओसचा दौरा कमी पैशात झालेला आहे.

Aditya Thackeray vs Uday Samant
Ranbir Kapoor: 'अ‍ॅनिमल' नंतर रणबीरचा भाव वाढला! पुढील चित्रपटांसाठी घेणार 'इतके' कोटी?

उद्योगमंत्री म्हणून आश्वासन देतो

शिष्टमंडळ जरी मोठं असेल त्यापैकी एएमआरडीए तिथं एमओयू करणार आहे. उद्योग विभाग स्वतः एमओयू करणार आहे. तसेच आम्हाला मदत करायला जे स्वःखर्चानं तिथं गेले आहेत त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. एकही रुपयाचा अपव्यय होणार नाही, याची खात्री मी उद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला देतो. तसेच येताना दावोसमधून ऐतिहासिक एमओयू करुन मुख्यमंत्री परततील हा विश्वास देखील मी जनतेला देतो. (Marathi Tajya Batmya)

Aditya Thackeray vs Uday Samant
Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर बंद

जनतेची दिशाभूल करणं थांबवा

जनतेची दिशाभूल करणं थांबवावं. २१ तारखेला जेव्हा आम्ही आकडेवारी देऊ त्यानंतर त्यावर भाष्य करावं. जाताना कोणी अपशकुनीसारखं वागू नये, महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे प्रयत्न करत आहेत ते मोठे आहेत. त्या प्रयत्नाला यासर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. (Latest Marathi News)

Aditya Thackeray vs Uday Samant
Marathi News Live Update : अजित पवारांचं बंड आणि इतर राजकीय घडामोडी एका क्लिकवर

१५ ते १९ जानेवारीला दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. 15 जानेवारी ते 19 जानेवारीला दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि सुमारे २० सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. मात्र, या दौऱ्याला गरजेपेक्षा जास्त लोक जात असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका होती तसेच या दौऱ्याचा खर्चही सरकारी तिजोरीतून होणार असल्याचं ठाकरेंनी सांगितले होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.