ST Employee Strike : ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मागे; उदय सामंत म्हणाले, आमचे सदावर्तेंबरोबर मतभेद कायम, पण...

Uday Samant
Uday Samantesakal
Updated on

राज्य शासनात विलीनीकरण, सातवा वेतन आयोग, शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने आजपासून एसटीच्या संपाची हाकही दिली होती. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने काही निर्णय घेतल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

या आंदोलनापूर्वीच सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले असल्याची माहिती आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत म्हणाले की, पाच महत्त्वाच्या निर्णयांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, असेही सामंत म्हणाले.

पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णय झाला. बोनस वाढला पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहीर करतील असेही समंत म्हणाले. तसेत कर्मचाऱ्यांनी आजपासूनचं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं

Uday Samant
Gram Panchayat Election Results: भाजप पाठोपाठ अजित पवार गटाची मुसंडी, महायुतीचं वर्चस्व तर आघाडीचा धुराळा; आत्तापर्यंत कोणाला किती ग्रामपंचायती मिळाल्या

मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्णय घेतला असून २ हजार २०० बसेस नवीन गाड्या येणार असल्याचे सामंत म्हणाले. २०२५-२६ ला २ हजार ५०० बसेस येतील . येत्या चार वर्षात एसटीत ९ हजार बसेस दाखल होतील. तसेच. या दोन वर्षात अडीच हजार ईव्ही गाड्या दाखल होतील. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ते नफ्यात येतंय हे दिसतंय. इलेक्ट्रिकल व्हेईकल येतायत त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनं चांगला निर्णय आहे. खासगीकरण मुळीच होणार नाही असेही सामंत यांनी स्पष्ट केलं.

एमआयडीसी मार्फत क्राँक्रिटीकरणासंदर्भात आम्ही ५०० कोटी रुपये एसटीला दिले आहेत. एमओयू संदर्भात बुधवारी करार होईल. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.

सदावर्ते हे कष्टकरी जवसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर आमची भूमिका आहे, त्यांचा मदत करणं. आमची भूमिका स्पष्ट आहे, सदावर्तेंबरोबर एसटीसंदर्भात चर्चा झाली याचा अर्थ हा नाही की आरक्षणावर त्यांचे विचार आम्हाला मान्य आहेत.

आमचे सदावर्ते यांच्याबरोबर मतभेद कायम असतील. मराठा आरक्षण आम्हाला द्यायचं आहे कुठेही फुट पडेल असं आम्हाला वाटत नाही. काही लोकांनी मागणी करणं कुणबी प्रमाणपत्र द्यावं तसं आम्ही प्रयत्न करतोय. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असली तरी आम्हाला मराठा आरक्षण टिकणारे द्यायचं आहे असेही सामंत म्हणाले.

Uday Samant
IND vs SA : कोलकाता पोलिसांनी बीसीसीआय अध्यक्षांनाच धाडली नोटीस; भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यानच वातावरण तापलं?

ग्रामपंचायतमध्ये पहिल्या स्थानावर भाजप, दुसऱ्यावर धनुष्यबाणाची शिवसेना आहे. तीनला अजितदादांची राष्ट्रवादी आहे तर पाचला कांग्रेस आहे. महायुतीच्या १८१ जागा आम्हाला मिळाल्या. शेवटचा इतर कॉलम आहे, त्यात त्यांचे ॲड करा तरी तिथे ते येत नाही, आगपाखड आणि बोंबाबोंब करत काही होत नाही हे सिद्ध झालं, असा टोला सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()