Uday Samant : 'त्या' घटनेच्या मुळाशी जाणार; पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा, म्हणाले...

रिफायनरीच्या मुद्द्यावरुन बोलताना उदय सामंत म्हणाले की, बारसू रिफायनरी आणि काल निघालेल्या नोटिफिकेशनचा काही संबंध नाहीये. तिथल्या स्थानिक लोकांची मागणी होती एमआयडीसी व्हावी त्यानुसार ते नोटिफिकेशन निघालं आहे,
Uday Samant
Uday Samant sakal
Updated on

रत्नागिरीः रत्नागिरीमध्ये वासराचे शीर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी मूळापर्यंत तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

'साम टीव्ही'शी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, गायीच्या वासराच्या अमानुष मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू आहे, कडक कारवाई व्हावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असून या घटनेच्या मुळाशी पोहचलं पाहिजे.

रिफायनरीच्या मुद्द्यावरुन बोलताना उदय सामंत म्हणाले की, बारसू रिफायनरी आणि काल निघालेल्या नोटिफिकेशनचा काही संबंध नाहीये. तिथल्या स्थानिक लोकांची मागणी होती एमआयडीसी व्हावी त्यानुसार ते नोटिफिकेशन निघालं आहे,

Uday Samant
Ambani Family Sangeet: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला धोनी, हार्दिकसह अनेक क्रिकेटपटूंही हजेरी, पाहा Video

रिफायनरीचा विषय हा अतिशय वेगळा आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावरच्या ज्या एमआयडीसी करतोय त्यासाठीच पहिलं नोटिफिकेशन हे राजापूरचं निघालं आहे.

संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर

''तुम्ही काही लोकांचं फारच मनावरती घेता.. संजय राऊत हे दखल घेण्याएवढे सुद्धा शिल्लक राहिले नाहीत. मुस्लिम आणि दलित मतांची जी सूज आहे ती येत्या विधानसभा निवडणुकीत कमी होईल. संजय राऊत यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाहीये.'' असं उदय सामंत म्हणाले.

गुजरातच्या गाडीवरुन उत्तर देताना सामंत म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अधिकारी सांगतात गाडी गुजरातमधून आणली, देश जिंकला आहे त्यामुळे यासाठी जर गाडी गुजरातमधून आणली असेल तर त्यात बिघडलं कुठे? 11 कोटी रुपये दिले ही देशवासीयांची भावना आहे. याचा राजकीय मुद्दा महाराष्ट्रात होतो हे फार दुर्दैवी आहे.. राखीव खेळाडूंनी याच्यावरती बोलू नये. असा चिमटा त्यांनी काढला.

काय म्हणाले उदय सामंत?

  • आम्ही दोन वर्षांपूर्वी कुणाचा बोल्ड उडवायचा तो उडवला आहे

  • टीम मधल्या लोकांनी बोलावं राखीव खेळाडूंनी बोलू नये

  • त्यांनी फक्त पाणी घेऊन यायचं असतं

  • क्रिकेट हा सांघिक खेळ काहींना स्वतः कमवायची सवय

  • तिघांपैकी एक उमेदवार पडणार

  • कोण पडणार ते आम्ही ठरवू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.