Maharashtra Politics : ही आमदार थांबवण्याची खेळी, थोड्या दिवसातच सत्य काय ते कळेल; सामंतांच सूचक ट्वीट

Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal
Updated on

शिवसेनेतील आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीतअसल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले असून हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. १३ पैकी ९ खासदारही आमच्या संपर्कात आहेत असा दावा करत खळबळ उडवून दिली होती.

दरम्यान आता विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यांना शिंदे गटातील आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "शंभूराज देसाई आणि २२ आमदार नाराज हे पत्रकार परिषद घेऊन सांगणे म्हणजे आपल्या सोबतचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत निघाले आहेत ह्यावर शिक्कामोर्तब करणे आहे...त्यांना थांबण्यासाठी केलेली ही राजकिय खेळी आहे...थोड्या दिवसात कळलेले असेल नक्की सत्य काय आहे.." असं ट्वीट सामंतांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Anil Parab : "नाक घासून माफी मागावी लागेल किंवा…"; अनिल परबांनी सांगितलं सोमय्यांनी याचिका मागं घेतल्याचं कारण

विनायक राऊत काय म्हणाले होते?

खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले असून हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. तसेच १३ पैकी ९ खासदारही आमच्या संपर्कात असून खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. कामं होत नाहीत, तुच्छतेची वागणूक मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:चं बुड स्थावर केलं आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार या आमदार, खासदारांनी केला असल्याचा दावा विनायक राऊतांनी केला होता.

इतकेच नाही तर, शंभूराजे देसाईंनी १५ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला होता. आमची इकडे गळचेपी होत आहे, असं शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Pune Crime News : पुणे हादरले! वाघोलीत भाजी चिरण्याच्या चाकूनं प्रियकराची हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.