Udayanraje Birthday : मोठ्या घोषणेपूर्वीच उदयनराजे म्हणाले..

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

खासदार उदयनराजे आज मोठी घोषणा करणार आहेत.

Udayanraje Bhosale Birthday : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज मोठी घोषणा करणार आहेत. त्यामुळं ते काय घोषणा करणार याची जास्तच उत्सुकता आहे. राजकीय क्षेत्रात उदयनराजे यांच्या या नव्या भूमिकेमुळं जोरदार चर्चा सुरुय. वाढदिवसाचे औचित्य साधत उदयनराजे सामाजिक कार्य की राजकीय निर्णय घेणार, याची कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते आजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक मोठी घोषणा करणार आहेत, असं त्यांनी काल (बुधवार) पत्रक प्रसिद्ध केलंय. साताऱ्यातील गांधी मैदानावर आज 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ही घोषणा ते करणार आहेत. या पत्रकात त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू करणार असल्याचं सांगितलंय. मोठ्या घोषणेपूर्वी आज उदयनराजेंनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरती एक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी म्हंटलंय, शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्यलढा आधुनिक पद्धतीनं शालेय मुला-मुलींपर्यंत पोहोचवणारा अभिनव उपक्रम म्हणजे, मावळ्यांची शाळा.. मीती इन्फोटेन्मेंट यांच्या तांत्रिक सहयोगातून या उपक्रमास साताऱ्यातून सुरुवात होत आहे. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि गेली ७५ वर्षे स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला भारत देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षणक्षेत्र देखील त्याला अपवाद नसून याही क्षेत्रात आमुलाग्र बदल आपण पाहिले आहेत.

Udayanraje Bhosale
007.. हटके स्टाईल, डायलॉगबाजी, कॉलर अन् बरंच काही; उदयनराजेंचा नादच खुळा

मात्र, अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एक विषयापर्यंत मर्यादित राहिलाय. सनावळ, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाहीय. शिवछत्रपतींचा (Chhatrapati Shivaji Maharaj) खरा इतिहास आधुनिक, तसेच रंजक पद्धतीनं शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा हाच आमचा हेतू आहे. 'मावळ्यांची शाळा' या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीनं शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्यलढा हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत, प्रोजेक्टर्स आणि व्हिजुअल ग्राफिक्सच्या सहाय्यानं आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील.

Udayanraje Bhosale
'मोठी घोषणा करणारी' पोस्ट उदयनराजेंनी केली Delete; शब्द पाळणार?

शालेय अभ्यासक्रम ज्या वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो, त्या स्वराज्ययोद्ध्यांना त्यांच्यापर्यंत अधुनिक पद्धतीनं पोहोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावं? एकूणच शिवचारित्र्यातून कोणते बोध घ्यावेत? ह्याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आलीय. हा उपक्रम अस्सल इतिहास प्रेरणादायी पद्धतीनं मुलांपर्यंत पोहोचवता पोहोचवता शहरातील अनेक हुशार तरूणांना रोजगार देखील देईल. तसेच एक अभिनव आणि आधुनिक शिक्षणपद्धती समोर आणेल की, जिच्या यशानं या उपक्रमाला भविष्यात मोठ्या प्रमाणावर राबवणे सोपं जाईल, असंही उदयनराजेंनी सांगितलं आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे हे मोठी घोषणा करणार आहेत. त्यामुळे ते काय घोषणा करणार याची जास्तच उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()