जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍‍न मिटवा नाही तर..

जातीय तेढ कशामुळे आणि कोणामुळे वाढलाय, याचा शोध प्रत्‍येकाने घेणे आवश्‍‍यक आहे.
Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosaleesakal
Updated on
Summary

आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे-पाटील यांनी राज्य हादरून सोडले आहे, तसेच झोपेतून जागे करण्याचे काम त्यांनी केले आहे.

सातारा : आज प्रत्‍येक जण म्‍हणतोय. आम्‍ही इतके. आम्‍ही एवढे. हे टाळायचे असेल आणि सर्वांना न्‍याय, अधिकार मिळायचा असेल, तर जातीनिहाय जनगणना आवश्‍‍यक आहे. ती झाली की देऊन टाका ज्‍याच त्‍याला जे पाहिजे ते. कशाला वाद. मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो. काय ते प्रश्‍‍न मिटवा, नाही तर देशाचे तुकडे होतील. वाट लागायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी जलमंदिर येथे नोंदवली.

Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
Maratha Reservation : दुसरीकडून कुठूनही नाही, आता मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार; साताऱ्यात जरांगे-पाटलांचा निर्धार

मराठा आरक्षणासाठी दौऱ्यावर असणारे मनोज जरांगे-पाटील यांच्‍या भेटीनंतर ते जलमंदिर येथे प्रसार माध्‍यमांशी बोलत होते. या वेळी मनोज जरांगे यांच्‍यासह इतर मराठा (Maratha Reservation) बांधव उपस्‍थित होते. उदयनराजे म्‍हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही भेदभावाला थारा दिला नाही. मनोज जरांगे आज राज्‍यात फिरत आहेत. का फिरत आहेत. कशासाठी फिरत आहेत. कशामुळे ही वेळ आली. याचा विचार प्रत्‍येकाने करणे आवश्‍‍यक आहे.

मी कुणाचेही समर्थन करत नाही. मनोज जरांगे आरक्षणासाठी मरायला तयार झालेत. का, कशासाठी? का तर अन्‍याय झालाय म्‍हणून. जनगणना करा. कोणावरही अन्‍याय करू नका, असे माझे म्‍हणणे आहे. जनगणना करा आणि आवश्‍‍यक आहे, त्‍याला आरक्षण द्या. मी मराठा म्‍हणून बोलत नाही. आज सगळी जण गुणवत्तेबाबत विचार करू लागले असून, मलाही वाटते गुणवत्तेवर आधारित आरक्षण असावे.

प्रवेशावेळी प्रत्‍येक ठिकाणी जातीजातीचा विषय निघतो. जातीय तेढ कशामुळे आणि कोणामुळे वाढलाय, याचा शोध प्रत्‍येकाने घेणे आवश्‍‍यक आहे. प्रश्‍‍न सोडवणार नसाल तर माणसाने जगायचे कसे, असा सवालही या वेळी उदयनराजे यांनी उपस्‍थित केला.

Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
Maratha Reservation : 'राणा भीमदेवी थाटात भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करताहेत, भाजप तर त्यांना धमकावत नाही?'

जरांगें ओबीसीमधील आरक्षणासाठी आग्रही आहेत, या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर उदयनराजे म्‍हणाले, ‘‘माझं तर म्‍हणणे आहे जनगणना करा आणि देऊन टाका ज्‍याला पाहिजे त्‍याला. प्रत्‍येकाला जगण्‍याचा, चांगले शिक्षण घेण्‍याचा अधिकार आहे. तो मिळालाच पाहिजे आणि त्‍यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्‍‍यक आहे.’’ याचदरम्‍यान त्‍यांनी हात जोडत सर्वांना विनंती केली. विनंती करताना, हात जोडतो. काय ते प्रश्‍‍न एकदा मिटवा. नाही तर देशाचे तुकडे होतील, वाट लागयला वेळ लागणार नाही, असेही त्‍यांनी स्पष्ट केले.

पाडा... पाडा मी उभाच राहणार नाही

जालना येथे झालेल्‍या ओबीसी मेळाव्‍यात मराठा समाजाचे दीडशे आमदार आम्‍ही पाडू, असे वक्‍तव्‍य केल्‍याबाबत विचारले असता, उदयनराजे म्‍हणाले, की पाडा..पाडा.. मी म्‍हणतो. अजून काय बोलू. मी तर काय निवडणुकीला उभा राहणार नाही, असे ‍‍वक्तव्य करत त्‍यांनी त्‍या विधानाची खिल्‍ली उडवली.

भुजबळांनी जातीय तेढ वाढवू नये - शिवेंद्रसिंहराजे भोसले

छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन जाती-जातीत तेढ निर्माण करू नये. मराठा समाजाने आतापर्यंत कुणाचे हिसकावून मागितले नसून कायद्यानुसार हक्काचा वाटा मागितला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण व समाजाच्या विरोधात कुणीही बोलू नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी केले आहे.

Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
Kunbi Certificate : कुणबी नोंदीवरून 'इतक्या' दिवसांत जात प्रमाणपत्र देणं बंधनकारक; राज्यात तब्बल 4 लाखांवर आढळल्या नोंदी

याच वेळी त्यांनी भुजबळ यांनी राजीनामा देण्याच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीचे समर्थन केले. मनोज जरांगे पाटील यांची गांधी मैदानातील सभा झाल्यानंतर त्यांनी सुरुची येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. या वेळी श्री. जरांगे-पाटील यांना शिवछत्रपतींची मूर्ती भेट देऊन स्वागत केले. या वेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘राज्यभरात मराठा समाजाने शांततेत मोर्चा काढून शिस्तीचे दर्शन घडविले होते. त्या लढ्यापासून आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्हा कायमच अग्रभागी राहिला आहे. या लढ्याला बळ देत आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे-पाटील यांनी राज्य हादरून सोडले आहे, तसेच झोपेतून जागे करण्याचे काम त्यांनी केले आहे. सद्यःस्थितीत आरक्षण निर्णायक टप्प्यावर आले असून, समाजाने कायद्यात चौकटीत राहून काम केले पाहिजे. समाजातील गरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे.

त्यामुळे राज्यातील काहींनी या लढ्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये. दोन समाजात मतभेद निर्माण होतील, अशा प्रकारची वक्तव्ये करून समाज घटकांमध्ये दुफळी निर्माण करू नये. मराठा समाजाने आतापर्यंत कुणाच्या ताटतलं मागितले नसून हक्काचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपण सर्वांनी एकत्र येऊन बळ दिलं पाहिजे.’’ दरम्यान, लोकशाहीतील योद्धे मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
राज्यात धुमधडाक्यात हंगाम, पण शेट्टींच्या आंदोलनाची कारखानदारांना धास्ती; कोल्हापुरात फक्त 'इतकेच' कारखाने सुरू

मराठ्यांच्या राजधानीतील स्वागत सर्वोच्च

सुरुची बंगल्यावर स्वागत झाल्यानंतर जरांगे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाच्या लढाईत दोन्ही राजेंनी दिलेल्या पाठिंब्याने लढ्याला बळ आणि ऊर्जा मिळाली आहे. तसेच मराठ्यांच्या राजधानीतील स्वागत सर्वोच्च आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.