हर हर महादेव म्हणत मतदान.. ;उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली.
हर हर महादेव म्हणत मतदान.. ;उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
Updated on

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेत्या प्रियांका गाधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. निवडणूक आयोगाने भाजपला फ्री हिट दिलीये का? आणि आमची विकेट काढणार का? असा सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे. आचार संहितेबाबत आयोगाकडून भाजपला फ्री हिट देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी बजरंग बलींच्या नावाने मतदान मागितले. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशमध्ये सभेमध्ये राम मंदिराच्या मोफत दर्शनासाठी घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे निवडणूक आयोगाने नियमावलीत बदल केले आहेत का? तसं केलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं म्हणत त्यांनी टीका केली.

हर हर महादेव म्हणत मतदान.. ;उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
Rajasthan Election: 'आधी एक पाय तोडण्याचा विचार केला, मात्र आता...' भाजप नेत्याची धमकी व्हायरल; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

आचारसंहितेत निवडणूक आयोगाने बदल केला आहे का? आणि तो केला असेल तर त्याबाबत भाजपला सांगितलं आहे का? इतर पक्षांना सांगितलेलं नाही का? माझं माझ्या पक्षाला आव्हान आहे की, त्यांनी देखील निवडणुकीमध्ये हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, मंगळमूर्ती गणेश, श्री रामाच्या नावाने मतदान मागावे, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

१९८७ मध्ये पोटनिवडणूक झाली होती. यावेळी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली आणि शिवसेनेने ती जिंकली होती. मंदिर वही बनायेंगे असं म्हणत शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने आप आमदारांवर कारवाई केली. बाळासाहेबांचाही मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. या प्रचाराला करप्ट प्रॅक्टिस असा उल्लेख निवडणूक आयोगाकडून करण्यात आला होता, अशी माहिती ठाकरेंनी दिली.

हर हर महादेव म्हणत मतदान.. ;उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
Election Commission: PM मोदींविरोधात टिप्पणी! निवडणूक आयोगाची थेट केजरीवाल अन् प्रियांका गांधींना नोटीस

कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदी यांनी बजरंग बली की जय म्हणत मतदान देण्याचे आवाहन केले होते. अमित शाह यांनी मध्य प्रदेशमध्ये मोफत राम दर्शनाचे आश्वासन दिले. निवडणुकीच्या राज्यातच ही घोषणा का? सर्व देशातील नागरिकांना मोफत दर्शन घडवून आणले जावे. निवडणूक आयोगाने नियम बदलले असतील, तर आम्ही स्वागत करतो. पण, ते नियम आम्हालाही सांगावेत असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सर्वात आधी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय क्रिकेट संघाच्या उत्तम कामगिरीचे कौतुक केले. माझ्या पिढ्यांचे भाग्य समजतो की तीन पिढ्यांचे विक्रम आम्ही पाहिले, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.