Uddhav Thackeray : 'अयोध्येला जाण्यापूर्वी मी एक मोठं काम केलं अन् सीएम झालो' ठाकरेंनी सांगितली आठवण

Uddhav Thackeray : 'अयोध्येला जाण्यापूर्वी मी एक मोठं काम केलं अन् सीएम झालो' ठाकरेंनी सांगितली आठवण
Updated on

मुंबईः आज मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. गळ्यात पट्टा घालून कुणाचीतरी गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही; असा टोला त्यांनी शिंदे गटाला नाव न घेता लगावला.

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे दोन व्यक्ती भेटल्यानंतर राम-राम घालतात. तर तुमच्याकडे जय श्रीराम म्हणातात. शेवटी राम आहेच. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामलल्लाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे

  • उत्तर भारतीयांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त केलं.

  • मुस्लिमांचा द्वेष करा, असं बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नाही

  • गळ्यात पट्टा घालून कुणाचीतरी गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही

  • तोडा आणि फोडा, असं राजकारण आम्हाला करता येत नाही

  • आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदुत्वाची साथ कायम आहे

राम मंदिराच्या मुद्द्यात आम्हीच लक्ष घातलं- ठाकरे

  • राम मंदिराचा मुद्दा खितपत पडला होता, परंतु आम्ही भूमिका घेतली

  • हवं तर स्वतंत्र कायदा करा परंतु राम मंदिराचा प्रश्न सोडवा,अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती

  • मी अयोध्येत जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथली माती प्रभू रामाकडे नेली होती

  • नंतर मी मुख्यमंत्री झालो आणि राम मंदिरही उभं राहात आहे

  • आम्ही महाराष्ट्रात राम-राम म्हणतो आणि तुमच्याकडे जय श्रीराम म्हणतात.. शेवटी राम आहेच

  • 'राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे' असं बाळासाहेब म्हणायचे. हेच आमचे संस्कार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.