Uddhav Thackeray: अहमद शाह ते अमित शाह... वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

Devendra Fadnavis: यावेळी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनाही ललकारत त्यांच्यावर जोरदार टीका.
Uddhav Thackeray, Amit Shah And Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Amit Shah And Devendra FadnavisEsakal
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आज पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले.

यावेळी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनाही ललकारत त्यांच्यावर जोरदार टीका. यासह उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, "जशी औरंगजेबाची कबर बांधली, तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रात बांधा."

"अहमद शहाचा राजकीय वंशज..."

या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावरच सर्वाधिक टीका केली. ते म्हणाले, "अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा इकडे वळवळायला आला होता. तो पण शहा, हे पण शहा. आम्हाला हिंदुत्व शिकवतो. नवाज शरीफचा केक खाणारी औलाद तुमची अन् तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं का?"

ढेकणाला आव्हान देत नाही

गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे-फडणवीस यांच्यात शाब्दिक वार सुरू आहेत. यापूर्वी एका कार्यक्रमात ठाकरे फडणवीसांना म्हणाले होते की, एकतर तू राहशील किंवा मी राहीन"

यावर फडणवीसांनी, "मी काणाच्या नादाला लागत नाही, आणि लोगलो तर सोडत नाही," असे म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या या विधानाला, "माझ्या नादाला लागू नका म्हणतात, पण तुझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीच. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा दरोडेखोर, असे म्हणत उत्तर दिले.

आता हिशोब करावा लागेल

राममंदिराला गळती लागली, संसदही गळायली लागली आहे. ज्या कंत्राटदाराने संसदेचे कंत्राट घेतले होते तोच पुण्यामधील नद्या मुजवायचे काम करत आहे, अशी माझी माहिती आहे. पेपर लीक होतायेत, संसद गळतेय. याला गळती सरकार म्हणायचे नाही तर काय म्हणायचे. ⁠

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा ते सुभेदार होते. त्यामुळे मी इकडे लक्ष दिले नाही. पण आता हिशोब करावा लागणार आहे, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपला सुनावले.

Uddhav Thackeray, Amit Shah And Devendra Fadnavis
NCP vs BJP: विधानसभेपर्यंत महायुती टिकणार का? अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव

चंद्राबाबु, नितीश काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का?

"अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज असेलेले अमित शहा आले होते. त्यांनी पुण्यात येऊन भाषण केले आणि निघून गेले. त्यांनी सांगावे त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? चंद्राबाबु नायडु, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, "आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व साधू संतांचे महाराष्ट्राला पुढे नेणारे आहे."

Uddhav Thackeray, Amit Shah And Devendra Fadnavis
Uddhav Thackeray In Pune: ढेकणाला आव्हान द्यायचं नसतं, चिरडायचं असतं; ठाकरेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल

जनतेच्या न्यायालयात

"शिवसेना म्हणजे भाकड जनता पक्ष नाही. तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे. त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर सोपवली. आता जनता न्यायाधीश असून आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसैनिक दूत, वकील आहात. जनता न्यायालयात सुनावणी सुरू झालीय. जनता आपल्याच बाजूने न्याय देईल असा मला विश्वास आहे," असे उद्धव ठाकरे आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.