Maharashtra Bhushan: ...म्हणून कार्यक्रम दुपारी ठेवला का?, उष्मघाताने श्रीसेवक दगावल्याने उद्धव ठाकरे संतापले

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचे उपचार सुरू असताना निधन
uddhav thackeray angry on 11 died of heat stroke Maharashtra Bhushan Award Ceremony
uddhav thackeray angry on 11 died of heat stroke Maharashtra Bhushan Award Ceremony
Updated on

खारघर येथे आयोजित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे काही श्री सदस्यांना रुग्णालयात हलवावे लागले, दुर्दैवाने त्यातील ११ जणांचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यानंतर राज्यभरात सरकारवर टीकेची झोड उठत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरुन राज्यसरकारला संतप्त सवाल उपस्थित केला आहे. (uddhav thackeray angry on 11 died of heat stroke Maharashtra Bhushan Award Ceremony)

नागपूरमधील महाविकास आघाडीची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनी एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची भेट घेतली. श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक आहे. अमित शाहांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

दरम्यान सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक श्री सदस्य गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.