Uddhav Thackeray : मुलं पळवणारे होते, आता बाप पळवणारे आलेत; ठाकरी तोफ धडाडली

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग काढत उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी पदाधिकाऱी मेळाव्यात बंडखोरांवर कडाडून टीका केली. (Uddhav Thackeray news in Marathi)

Uddhav Thackeray
Shivsena: आम्ही आता मोदींचा फोटो लावत नाही, तुमच्या बॅनरवर बाळासाहेब का? सेनेचा सवाल

उध्दव ठाकरे म्हणाले की, व्यासपीठावर आल्यानंतर आधी पाहिले आमचे वडील आहेत, का जागेवर ते पाहिलं. आतापर्यंत मुलं पळवणारे पाहिले होते. आता बाप पळवणारेही आल्याची जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.

Uddhav Thackeray
Dasara Melava: राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा

तत्पूर्वी भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेला मुंबईच्या विकासासाठी मुंबई महापालिकेची सत्ता हवी आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचं केंद्रीय नेतृत्व मुंबईत आलं होतं. त्यांनी मुंबईत म्हटलं देखील मुंबई काबीज करण्याचं आमचं फार-फार जुनं स्वप्न आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उपस्थितांना आठवण करून दिला.

भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच कौतुक केलं आहे. १९९२ ची दंगल झाली. त्यावेळी शिवसेनेने मुंबई वाचवली. उध्दव ठाकरे यांच्याविषयी सर्व धर्मांमध्ये आदर आहे. ४० गद्दारांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उलट आजारी असताना गद्दारांनी उद्धव साहेबांच्या मागे ताकदीने उभं राहायला पाहिजे होतं, असंही भास्कर जाधव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.