84 कोटींचं फसवणूक प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला CBI कडून दिलासा

Uddhav Thackeray vs Shridhar Patankar
Uddhav Thackeray vs Shridhar Patankaresakal
Updated on
Summary

रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना सीबीआयनं दिलासा दिला आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना सीबीआयनं दिलासा दिलाय. मात्र, या प्रकरणी तपास सुरूच राहणार आहे. पाटणकर यांच्याविरोधात कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा (क्लोजर रिपोर्ट) अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) दिलाय.

कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा या प्रकरणी रिपोर्ट सीबीआयकडून (CBI) कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. कोर्टानंही तो स्वीकारलाय. हे 84.6 कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरण आहे. ईडीचा विरोध असूनही विशेष सीबीआय न्यायालयानं (CBI Court) क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. श्रीधर पाटणकर व्यवसायानं बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात प्रामुख्यानं त्यांचे प्रकल्प आहेत.

Uddhav Thackeray vs Shridhar Patankar
'ज्यांना स्वत:चं सरकार वाचवता आलं नाही, त्यांना महाराष्ट्रात पाठवलं'

या प्रकरणी ईडीनं (ED) युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. ईडीनं कारवाई दरम्यान श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्त केली. पण, आता पाटणकर यांना या प्रकरणी सीबीआयकडून दिलासा मिळालाय. पाटणकर गेल्या काही महिन्यापासून सीबीआय, ईडीच्या रडार होते.

Uddhav Thackeray vs Shridhar Patankar
फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल : ज्योतिरादित्य सिंधिया

काय आहे प्रकरण?

चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमतानं पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीत तब्बल 20 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. ही रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले असल्याचा आरोप आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं, असा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.