Varun Sardesai: सध्या कोणत्या पक्षातील नेते दुसऱ्या कोणत्या पक्षात जातील याचा काही नेम उरला नाही. शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यामुळे गट आणि ठाकरे असे दोन गट पडले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी भाजप सोबत युतीच सरकार स्थापन केलं त्यानंतर इतर पक्षातील नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा शिंदे गटाकडे वाढला आहे. अशातच ठाकरे गटाच्या काही महिला पदाधिकऱ्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी दाखवली होती.
ठाकरे गटातील युवासेनेच्या पुण्यातील ३५ महिला पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करणार होत्या. या महिला पदाधिाऱ्यांनी राजीनामे देखील दिले होते. मात्र युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी यात लक्ष घातलं आणि या ३५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा स्विकारला नाही.
राजीनामा दिलेल्या युवासेनेच्या ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील शिवसेना भवनात युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. या भेटीत या पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्याचे मन वळवण्यात वरुण सरदेसाई यशस्वी झाले. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नांवर पर्याय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरु ठेवा, असे सांगून वरुण सरदेसाई यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.