देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान तोकडं, मंत्रालयाच्या आवारात फिरकायच्या कुवतीचे नाहीत; उद्धव ठाकरेंचा बोचरा वार

uddhav thackeray and devendra fadnavis
uddhav thackeray and devendra fadnavis
Updated on

Maratha Reservation Issue

मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान इतकं तोकडं असल्याचं मला माहिती नव्हतं. खरं तर ते मंत्रालयाच्या आवारात फिरकायच्या देखील कुवतीचे नाहीत, अशी टीका त्यांनी केली. ते मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मराठ्यांचं आरक्षण गेलं. त्यांनी त्यावेळी वटहुकूम काढायला हवा होता, अशी टीका फडणवीस यांनी केल्याचं ठाकरेंना सांगण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्य सरकार ते काढू शकत नाही. त्यामुळे फडणवीसांचं ज्ञान तोकडं असल्याचं मला माहिती नव्हतं असं ते म्हणाले.

uddhav thackeray and devendra fadnavis
Maratha Andolan: जालन्यात झालेल्या लाठीचार्जबाबत मी क्षमा मागतो; बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांचा घटनेचा अभ्यास नाही. त्यामुळे त्यांना याप्रकरणात वटहुकूम कोण काढतं हे माहीत नसावं. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केंद्र सरकारने यावर अध्यादेश काढायला हवा. केंद्र सरकारने आता विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी त्यांनी केली.

मी सत्तेत असताना मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल. तर माझी चूक झाली असं समजा. आणि आता तुम्ही वटहुकूम काढा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या. सुप्रीम कोर्टचा निर्णय तुम्ही बदला असं आव्हान ठाकरेंनी यावेळी केलं. गणपती उत्सवाच्या काळात अधिवेशन बोलावण्यात आल्याने ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली.

uddhav thackeray and devendra fadnavis
अजित पवारांना मी समजदार समजत होतो, पण आता...; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

अजित पवारांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता ज्यांच्यावर आरोप झाले तेच तुमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे पुरावे मागा, असं ते म्हणाले. मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला झाला त्याला जबाबदार सरकारच आहे. त्यामुळे एक फूल आणि दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.