Uddhav Thackeray : "राजकीय बंडाळीमुळे देशात..." ; एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन शिंदे गटावर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच ठाणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यांनी ठाण्यात महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सभेला संबोधित केले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, "येणाऱ्या काही दिवसात मी ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे. अस्सल निष्ठावंत शिवसेनेत आहेत. राजन विचारे, केदार दिघे हे निष्ठावंत आहेत, या गोष्टींचे समाधान आहे. बाकिचे विकल्या गेले. ते कुठल्या भावाने विकल्या गेले हे सर्वांना माहित आहे. न्यायासाठी लाथ मारावी हे शिवसेनेचे ब्रिदवाक्य आहे. अस्सल निष्ठावंत शिवसैनिक इकडे आहेत." 

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जम्मू-कश्मीरमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की तिकडे देखील बंडखोरांविरोधात घोषणा केल्या जातात. देशाच्या कानाकोपऱ्यात ह्या घोषणा गेल्या आहेता (५० खोके एकदम ओक्के). मात्र यामुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
पहाटेचा शपथविधी पवारांची खेळी? NCPच्या दाव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यावेळी...

उद्धव ठाकरे म्हणाले, "निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले होते. ते विकले गेले. ही महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी आहे. गेले ते जाऊद्या पण जे अस्सल निखारे शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहीले, हे उद्या शिवसेनेत मशाल पेटवतील."

Uddhav Thackeray
Padma Bhushan : ३६ देशांमध्ये व्यवसाय उभारणाऱ्या कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण; असा उभा केला व्यवसाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.