Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना खरंच काँग्रेसची भीती? विधानसभेपूर्वीच मागितली 'ही' गॅरंटी

Maharashtra Assembly Elections Politics News : उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले होते मात्र २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांची खुर्ची गेली. इतकेच नाही तर पक्षात देखील मोठी फूट पडली होती.
Uddhav Thackeray Rahul Gandhi
Uddhav Thackeray Rahul Gandhi
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एकीकडे एनडीएमध्ये जागावाटप जाहीर करण्याची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून ओढातान पाहायला मिळत आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसकडे एका गॅरंटीची मागणी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे म्हणणे आहे की निवडणुकीत उतरण्यापूर्वीच हे ठरवून घ्यावे की जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे हेच होतील. २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते आणि सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले होते मात्र २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांची खुर्ची गेली. इतकेच नाही तर पक्षात देखील मोठी फूट पडली. दरम्यान सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेची इच्छा आहे की सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जावे आणि त्यानंतरच जागा वाटपाची चर्चा केली जावी. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जागांमध्ये देखील मोठी हिस्सेदारी हवी आहे. कारण त्यांना वाटते की, काँग्रेसने जास्त जागा लढवल्या आणि निवडणुकीनतर तो सर्वात मोठा बक्ष ठरला तर सीएम पदावर त्यांच्याकडून दावा केला जाऊ शकतो. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आणि म्हणूनच ते आधीच गॅरंटीची मागणी करत आहेत.

Uddhav Thackeray Rahul Gandhi
SBI Hikes Interest Rates : SBIचा ग्राहकांना मोठा झटका! आजपासून वाढणार कर्जांचा EMI, नवे दर काय समजून घ्या

गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि पक्षाचे इतर बडे नेते देखील होते. या दौऱ्यावेळी त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. याशिवाय शरद पवार यांच्याशीदेखील ते भेटले होते. यादरम्यान या सर्व नेत्यांकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची एकच मागणी होती की पहिल्यांदा सीएम पदाचा निर्णय घेतला जावा. २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात देखील याच मुद्द्यावर वाद झाले होते.

शिवसेनेचे म्हणणे होते की भाजपकडून त्यांना वचन देण्यात आले होते की निवडणुक जिंकल्यानंतर त्यांचा नेताच मुख्यमंत्री बनेल. तर भाजपने असा कुठलाही ठराव झाला नसल्याचे म्हटले. त्यामुळे २०१९ सारखी परिस्थिती टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सावध भूमिका घेतली जात आहे.

Uddhav Thackeray Rahul Gandhi
Video : मनोज जरांगे अन् संभाजीराजे येणार एकत्र? राज्यात नव्या आघाडीचे संभाजीराजेंकडून स्पष्ट संकेत

पण काँग्रेस मागे हटण्यास तयार नाहीये. कारण काँग्रेसने १७ लोकसभा जागांवर निवडणुक लढली होती आणि १३ जागा जिंकल्या देखील. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २१ जागांपैकी ९ आणि शरद पवार गटाने १० पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचे म्हणणे आहे की राज्यातील जनतेने सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांना कौल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जास्त जागांवर त्यांचा हक्क आहे. या चढाओढीदरम्यान विधानसभेच्या तोंडावर घडामोडींकडे सर्व राज्याचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.