Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना बंजारा समाजाकडून 'धर्माभिमानी' पदवी; पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात

BJP Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray Vidarbha Visit Pohradevi political news
BJP Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray Vidarbha Visit Pohradevi political news
Updated on

वाशिमः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीदेखील वाशिममध्ये बंजारा समाजाचं दैवत पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली.

उद्धव ठाकरेंनी पक्ष बांधणीच्या दौऱ्याला विदर्भापासून सुरुवात केली आहे. पोहरादेवीच्या दर्शनानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे सभा घेणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस हा संजय राठोड यांचा मतदारसंघ आहे. राठोड सध्या शिंदे गटामध्ये असून राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत.

उद्धव ठाकरेंना बंजारा समाजाकडून 'धर्माभिमानी' पदवी देण्यात येणार आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलेले आहे. नुकतंच त्यांनी पोहरावेदी येथे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झाले आहेत.

BJP Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray Vidarbha Visit Pohradevi political news
Asia Cup 2023 : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! आशिया कपच्या शेड्यूलबद्दल मोठी अपडेट

राठोड यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राठोडांवर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रिपदावरुन खाली खेचलं होतं. त्यानंतर शिंदेंच्या बंडामध्ये राठोडांनी पक्षबदल केला. आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून राज्याचा दौरा सुरू केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्याची सुरूवात दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्याने झाली आहे. यवतमाळ येथील पोहरादेवीच्या दर्शनानंतर दिग्रस येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

BJP Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray Vidarbha Visit Pohradevi political news
Pawar Vs Bhujbal : ''मला येवल्यात पाठवलं नाही तर..., सभेचं ज्यांनी नियोजन केलं त्यांची साडेतीन वर्षांपूर्वीच हकालपट्टी!''

यावेळी बोलताना उध्दव ठाकरेंनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर देखील भाष्य केलं आहे. आधी पक्ष फोडला जायचा. आता पक्ष पळवला जातो. हा पायंडा देशासाठी राज्यासाठी वाईट आहे असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.