Thackeray Vs Narvekar: अजून खेळ संपलेला नाही! नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात याचिकेत नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या
ShivSena MLA Case
ShivSena MLA Case
Updated on

मुंबई : ठाकरे गट पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे. या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेतली आहे. त्यामुळं हा खेळ अद्याप संपलेला नाही. (Uddhav Thackeray group filed a petition in Supreme Court against Rahul Narvekar verdict)

ShivSena MLA Case
Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर बंद

याचिकेत नेमकी काय तक्रार?

राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालादिवशीच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत हे सांगितलं होत की, नार्वेकरांचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा अवमान करणारा आहे. त्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ पण स्वतः कोर्टानच जर या निकालाची दखल घेऊन सुओमोटो दाखल करुन घ्यावी. अपेक्षेप्रमाणं कोर्टानं या निकालाची दाखल न घेतल्यानं अखेर ठाकरे गटानंच याचिका दाखल केली आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.

ShivSena MLA Case
Prakhar Chaturvedi : एका इनिंगमध्ये ठोकल्या ४०४ धावा! भारताला मिळाला लारा, केली विश्वविक्रमाची बरोबरी

ऑनलाईन याचिका दाखल

शनिवार रविवार सुट्टी असल्यानं दोन तीन दिवसांपासून याचिका दाखल करण्यात आली नव्हती. पण आज सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन स्वरुपात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं देखील या याचिकेची नोंद घेतली आहे. (Latest Marathi News)

ShivSena MLA Case
Apple: ॲपलने थांबवले AI टीमचे काम, 121 कर्मचार्‍यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

याचिका सुनावणीसाठी कधी येणार?

ठाकरे गटाच्या याचिकेची सुप्रीम कोर्टानं नोंद घेतली असून याचा सुनावणीच्या यादीत समावेश देखील करण्यात आला आहे. पण याचिका कधी सुनावणीसाठी कोर्टासमोर येईल, हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. पण याचिकेवर लोकसभा निवडणुकीच्या आधी सुनावणी घेऊन निकाल दिला जावा अशी मागणीही ठाकरेंनी यापूर्वीच केली होती. त्यामुळं आता कोर्ट याचिका कधी सुनावणीसाठी घेतं हे महत्वाचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.