मुंबईः केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांच्या संयम सुटल्याचं निदर्शनास आलं.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये बाजारबुणगे, चोर, हलकट, नामर्द असे शब्दप्रयोग केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
शेणच खायचं होतं तर एवढा खटोटोप का?- ठाकरे
पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्तांबद्दल बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी थोतांड केलं आहे. त्यांनी जेजे मागितलं ते त्यांना फॉरमॅटमध्ये आम्ही दिलं. परंतु आयुक्तांना जे करायचं ते त्यांनी केलंच. आज निवडणूक आयुक्तांनी जे शेण खाल्लं आहे ते खायचंच होतं तर एवढा खटोटोप का? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपला उद्देशून बाजारबुणगे, चोरबाजार, नामर्द, हलकटणा, मिंदे असे शब्दप्रयोग केले आहेत.
संतप्त होत उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शिंदे गटाने कागदावरचा धनुष्यबाण चोरला आहे. परंतु जो आमच्या देव्हाऱ्यात पुजला जातो, तो कसा चोरणार? शिवसेनाप्रमुख स्वतः या धनुष्यबाणाची पूजा करायचे त्यामुळे हा आमच्याकडेच राहणार आहे, असं म्हणत त्यांनी उपस्थित पत्रकारांना देवघरातला धनुष्यबाण दाखवला.
गहाण ठेवलेला धनुष्यबाण परत आणला- शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. २०१९ मध्ये त्यांनी ज्यांच्याकडे धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी सोडवून आणला, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे. २०१९मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन केल्याचा मुद्दा यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.