Uddhav Thackeray Video : ''वर्षभरापूर्वी खेकड्याने धरण फोडलं'' उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका

Uddhav Thackeray interview
Uddhav Thackeray interviewesakal
Updated on

मुंबईः मागच्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र काही उत्तर दिलेलं नव्हतं. आता यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहे.

येत्या २६ जुलै आणि २७ जुलै या दोन दिवशी दोन भागांमध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतील. या मुलाखतीचा प्रोमो आज प्रसारित करण्यात आलेला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे रोखठोकपणे उत्तर देतांना दिसत आहेत.

'प्रोमो'मध्ये संजय राऊत विचारतात- वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामुळे तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं... त्याला उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं आहे. असं म्हणून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला.

Uddhav Thackeray interview
Pune Rain News : पुण्यात पावसाचा जोर वाढणार घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

त्यानंतरचा प्रश्न राऊतांनी विचारला. ''फडणवीस असं म्हणतात, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजित खुपसला...'' त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं, जेणंकरुन तुम्ही राष्ट्रवादी तोडली. रोज उठसुट दिल्लीला मुजरा मार, ही आपली संस्कृती नाहीये. त्यांना मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर संपवा.. बघूया जनता कुणासोबत आहे.

Uddhav Thackeray interview
Supreme Court:नोटीस का पाठवली?कथित कोळसा घोटाळा प्रकरणात सुप्रिम कोर्टानं EDला फटकारलं

उद्धव ठाकरेंची ही मुलाखत वादळी होणार असं दिसतंय. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना ठाकरेंनी या मुलाखतीमधून उत्तर दिलं आहे. विशेषतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांच्या आघाडीवर ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.