माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचबरोब भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली.
दरम्यान, भविष्यात भाजपला गरज पडल्यास शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांच्या सरकार बनेल का असा प्रश्न विचारताच ठाकरे म्हणाले, मी त्या फटीतून जाणार नाही असे म्हणत एका वाक्यात उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात तब्बल 13 वेळा येऊन गेले आहे. आता शेवटच्या टप्प्यातील काही जागांवरील प्रचारासाठी मोदी महाराष्ट्रा प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील प्रचारात मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांच्या पक्षांना नकली म्हटले. तर नुकतेच नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत मोदी यांनी ठाकरे पवार यांना एनडीएत येण्याची साद घातली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एनडीए प्रवेशाच्या निमंत्रणावरुन 'सामना'ने घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ठाकरे यांना विचारण्यात आले की, उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय?
या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? बाळासाहेबच एकदा मला युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते. तिथे छान सेट बनवले होते. जसे आपल्या नितीन देसाईंनी बनवले होते. त्यात अशा भिंती, खिडक्या असतात आणि त्या खिडकीतून पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं. अशा खिडकीचा काय उपयोग?"
पुढे विचारले की, खिडकी उघडली की दरवाज्याची फट उघडली आहे? गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो.
त्यावर ठाकरे म्हणाले, "मी फटीतून जाणार नाही..."
लोकसभा निवडणूक 2024 साठी देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. महाराष्ट्रात ही निवडणूक 5 टप्प्यांमध्ये आहे. त्यातील तीन टप्पे पार पडले असून, आज राज्यात चौथ्या टप्प्यातील 11 जगांवर मतदान होत आहे.
गेल्या दोन वर्षात राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाची निवडणूक खूप चुरशीची होत आहे. महाविकास आघाडी आण महायुती आपणच सर्वाधिक जागा जिंकणार असा दावा करत आहेत. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.