Udhhav Thackeray News : सर्वात मोठा गौप्यस्फोट होणार! उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर रिलीज

Uddhav Thackeray interview teasers relese UBT new Podcast sanjay raut maharashtra politics
Uddhav Thackeray interview teasers relese UBT new Podcast sanjay raut maharashtra politics
Updated on

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली असून ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत प्रसारित होणार आहे. दरम्यान नुकतेच या मुलाखतीचा टिझर समोर आला आहे.

उद्धव ठाकरे काय बोलणार?

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे या मुलाखतीत त्यांचे राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, अजित पवार यांचा शपथविधी, महाविकास आघाडीचं भवितव्य तसेच काँग्रेससोबत जात 'इंडीया' आघाडीत घेतलेला सहभाग या सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी दोन भागात प्रसिद्ध होणार आहे.

Uddhav Thackeray interview teasers relese UBT new Podcast sanjay raut maharashtra politics
Ajit Pawar News : अर्थमंत्री होताच अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी

टिझरमध्ये काय आहे?

या टिझरमध्ये आवाज कुणाचा, वर्षातील सर्वात मोठा, स्फोटक आणि थेट भाग लवकरचं अशी अक्षरं आणि उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा एकमेकांसमोर बसलेला फोटो या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. "महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज, 'आवाज कुणाचा' वर! लवकरच...." असेही या टीझरच्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray interview teasers relese UBT new Podcast sanjay raut maharashtra politics
Mumbai Water Supply Lakes Level : दिलासादायक बातमी! पाणी कपात लवकरच रद्द होणार; ७ तलावांमध्ये 'इतका' पाणीसाठी

पॉडकास्ट कशासाठी?

'आवाज कुणाचा' अशा नावाने उद्धव ठाकरे गटाकडून पॉडकास्ट सुरू करण्यात आलं आहे.शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि विविध राजकीय विषयांवर चर्चांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार आहे. पहिल्याच भागता उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे. विशेषतः तरुणांमध्ये सध्या पॉडकास्ट हा प्रकार लोकप्रिय असल्यानं याच्या माध्यामातून तरुण वर्गाला अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.