Uddhav Thackrey: 'शिवसेनेचे बंडखोर आमदार 'मातोश्री'च्या दारात आले तर..?', उध्दव ठाकरेंचं रोखठोक उत्तर

उध्दव ठाकरेंनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीवर मुलाखतीत रोखठोक भाष्य केलं आहे
Uddhav Thackrey
Uddhav ThackreyEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेनंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी बंड करुन शिंदे फडणवीसांना पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर काहीच दिवसात अजितदादांसह संपूर्ण आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पक्ष एकसंघ राहावा यासाठी चर्चा केल्यानंतर आणि शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

त्यानंतर विरोधी पक्षांनीही अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकांवर आक्षेप नोंदवायला सुरुवात केली होती. तर या संपुर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्टाईलनं उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackrey
Uddhav Thackrey: 'बाळासाहेंबानी मोदी, शाहांना वाचवलं होतं, त्याचे पांग मला संपवून फेडणार का?', ठाकरेंचा सवाल

'जसे फुटीर पवारांच्या दारात गेले. नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिले. पवारांचे फोटो लावून मतं मागत आहेत किंवा चर्चा घडवत आहेत. अशा प्रकारे शिवसेनेतले फुटीर जर तुमच्या दारात आले तर असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'त्यांची हिंमतच नाही येण्याची. आले तर वगैरेचा विषयच नाही. येऊच शकत नाहीत ते.त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहितेय आणि शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे, हे त्यांना माहिती आहे', असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackrey
Uddhav Thackrey: "ते असे आहेत... ते तसे आहेत" राहुल गांधींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंना काय वाटलं?

एकनाथ शिंदेनाही केलं लक्ष

'मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं ते सोडलं. असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं ढोंग होतं. ते म्हणतात, राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. आता राष्ट्रवादीच्याच हातात म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत.

त्यापूर्वी २०१४ ते २०१९ मध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही आता ज्यांच्याविषयी बोलताय याच महाशयांनी भाजपबरोबर कसं बसायचं म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेचे जे तथाकथित मंत्री होते जे आता गेलेत. मी न सांगता ते बडेजाव मारत होते की आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो. कोणी सांगितलं होतं तुम्हाला खिशात राजीनामे घेऊन फिरायला? का वेळ आली होती तुमच्यावर? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Uddhav Thackrey
Weather Update: पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.