Uddhav Thackeray
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना प्रकरणात दिलेल्या निकालावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. आज उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयात महापत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाने व्हिडिओ पुरावे दाखवत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांना इशारा दिला.
देशात सरकार मतदार ठरवतं असतो. सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. सर्व काही दाखवलं आहे, हा सूर्य आणि हा जयद्रथ! आता तरी न्याय मिळायला हवा. नार्वेकर आणि मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेत यावं, पोलीस प्रोटेक्शन न घेता आणि सांगाव शिवसेना कोणाची? मग जनतेनं ठरवावं कोणाला पुरावं, कोणाला गाडावं आणि कोणाला तुडवावं, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
मिंधे देखील कोर्टात गेले आहेत म्हणजे ते देखील नाराज आहेत. मग अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणा, मी पाठिंबा देतो, हाकला याला, असे ठाकरे म्हणाले.
आपण निवडणूक आयोगावर केस करायला हवी. आपण खर्च करुन प्रतिज्ञापत्र दिले. आयोगाला ते मान्य नाहीतर त्यांनी आपले पैसे परत करावे, हा मोठा घोटाळा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही, या कवी सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे परिस्थिती आहे. 2013 च्या निवडणूकीत होते ते सगळे? राम राम गंगाराम करणारे. मला सत्तेचा मोह नाही. एका क्षणात राजीनामा देऊन टाकला. राज्यपाल म्हणून त्यांचा नोकर बसवला होता त्यांनी अधिवेशन बोलावले तेच असंविधानिक होते. राज्यपाल महोदय, पदाचा मान म्हणून महोदय, त्या कटात सामिल झाले.
ही लढाई उद्धव ठाकरेंची नाही. लोकशाहीची आहे. सर्वोच्च न्यायालयाची असते. न्यायालय फाशीची शिक्षा देते, फाशी जल्लाद देतो. इथे जल्लाद म्हणतो की मी फाशी कशी देऊ? याचा जन्म दाखलाच नाही. नड्डा म्हणाले होते, या देशात फक्त एकच पक्ष राहणार 'भाजप'. सुरुवात तिथुन झाली, मग इडी, सीबीआय, आयोग इ. सगळे आले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे, वाईट याच वाटतं की, ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री प्रभुणे जन्माला आले, जिथे संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तिथुनच यांनी लोकशाहीची हत्या करायला सुरुवात करण्यात आली आहे. समजा 1999 ला असलेली आमची घटना शेवटची होती, मग 2014 साली मोदींना पाठिंबा द्यायला मला का बोलावलं होतं? 2019 साली का बोलावलं होतं?
"मोदीजी म्हणाले होते, अब बालासाहब नही रहे तो मैं सलाह मशविरा करना होता हैं तो उद्धवजी से करता हुँ, ते का?. पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद उबवलं ते कोणाच्या जोरावर? त्या मिंध्याबिंध्यांना पद, एबी फॉर्म, मंत्रीपद दिली मीच दिली होती की नाही?" असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
मिंधेंनी आता ते निवडून आले तेव्हाच्या त्यांच्या पक्षाची घटना दाखवावी, तेंव्हाच पक्षाच नाव, त्यांच पद इ. सह. मागचं राहु दे, आत्ता 2019 साली आमदार झालेत ना? तेंव्हाचा तुमचा पक्ष, पक्षप्रमुख कोण ते एक पत्रकार परिषद घेऊन सांग. सत्ता येते, सत्ता जाते... आत्ता गेली आहे, ती परत आणू. कशाचीही भिती नाही, हिंमत आहे आमच्यात, असे ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.