रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देण्याची सरकारची तयारी
मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारा कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून आता नवी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहली असल्याची माहिती मिळत आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार रिफायनरीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. (Refinery Project News)
मुख्यमंत्र्यांनी काय लिहलंय या पत्रात
नाणार रिफायनरीला (Nanar Refinery) स्थानिकांचा विरोधात आहे. यामुळे नाणार ऐवजी आता रिफायनरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांचा समावेश आहे. बारसू रिफायनरीसाठी जवळपास १४ हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास २४१४ एक जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच (Ratnagiri) होणार हे जवळपास निश्चित झालं असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देण्याची सरकारची तयारी असल्यान हा प्रकल्प आता रत्नागिरीतच होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. नाणार इथला तेलशुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेनं नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारचं मनपरिवर्तन झाल्यानं या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता नाणारचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
धोपेश्वर रिफायनरीद्वारे विकासाची गुढी उभारा - आदित्य ठाकरे
'सरकार तुम्ही दाद घ्या ना... रिफायनरी राजापूरला द्या ना', अशी साद घालत महिलांसह राजापूरवासीयांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे 'धोपेश्वर रिफायनरी झालीच पाहिजे', अशी आग्रही मागणी केली. या वेळी महिलांनी ठाकरे यांना गुढी भेट देऊन धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगाची म्हणजेच राजापूरच्या सर्वांगीण विकासाची गुढी उभारण्याची मागणी केली. या वेळी ठाकरे यांनीही महिलांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.