Uddhav Thackeray : मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंची टाईट फिल्डिंग; भाषणातून...

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sakal
Updated on

मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा संघर्ष सुरू झाला आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गटावर कडाडून टीका केली आहे. त्याचवेळी मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी टाईट फिल्डींग लावल्याचं आजच्या मेळाव्यावरून दिसून येत आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : मुलं पळवणारे होते, आता बाप पळवणारे आलेत; ठाकरी तोफ धडाडली

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी मुंबईसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेने केलेल्या अनेक कुटुंबाच्या पुनर्वसनाचे दाखले दिले. उद्धव म्हणाले की, एकदा शिवालयात बसलो असताना तरुण जोडपे आले होते. त्यांनी नाव सांगितले. तुम्ही सिरीयस असताना मला भेटायला आला होता. विजय गुरव असे त्याचे नाव होते. काही वर्षांपूर्वी वळूंजच्या घरी गेलो होतो. ऑफिसवरुन घरी येताना त्यानं समुद्रात उडी मारुन दोन मुलींना त्यानं वाचवलं. आणखी एकीला वाचवताना त्याचा मृत्यु झाला. शिवसेननं त्यांना आधार दिलाय.

Uddhav Thackeray
ShivSena Melava : संजय राऊतांच्या नावाची राखीव खुर्ची; व्यासपीठानं वेधलं लक्ष

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की नोकऱ्या चालल्या आहेत, वेदांत गेला त्याच्याबद्दल धांदात खोटे बोलत आहेत. तो प्रकल्प पुन्हा आणा. एकेक उद्योग निघून जाताहेत. मिंधे फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणत आहेत. महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीत का बोलत नाही. सांगा की पंतप्रधानांना हा प्रकल्प कसा काय गेला, म्हणजे हे अगोदरच ठरले होते. महापालिका जिंकण्यासाठी हा विषय नाही. शिवसेना ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी काम करते आहे. नैसर्गिक आपत्तींना सामोरी गेली आहे. प्रत्येकवेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो, असंही उद्धव यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.