केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता शिवसेना हे पक्षचिन्हं आणि नाव दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहेच, परंतु आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची चिन्हं मराठवाड्यात आता दिसू लागली आहेत. मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसणार का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
धाराशीवमध्ये शिवजंयतीनिमित्त उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिंदेच्या मंडपात दिसून आले. मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवून एकप्रकारे एकनाथ शिंदेंच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले.
तर आमदार कैलास पाटील हे तर गुजरातमधून शिंदेची साथ सोडून परत आले होते. मात्र आता पक्षाचं चिन्ह आणि नाव शिंदेंना मिळाल्यानंतर ओमराजे आणि कैलास पाटील यांची निष्ठाही बदलली का? अशी चर्चा सुरु आहे. धाराशीवमधून दोन लोकप्रतिनिधींनी ठाकरेंची साथ सोडली तर हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असेल अशा चर्चा आता सुरू झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.