Uddhav Thackeray meet Ajit Pawar : ठाकरे पिता-पुत्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला! उद्धव म्हणाले, जनतेला न्याय मिळेल कारण…

Uddhav Thackeray meet Ajit Pawar first time After NCP Crisis with Aditya Thackeray political news
Uddhav Thackeray meet Ajit Pawar first time After NCP Crisis with Aditya Thackeray political news eSakal
Updated on

Maharashtra Politics News : अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाकरे गटातील आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांना भेटले.

दरम्यान विरोधकांचा मोठा चेहरा मानला जात असलेले उद्धव ठाकरे हे थेट अजित पवारांच्या दालनात जाऊन त्यांना भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान ही भेट झाल्यानंतर काही वेळातच या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल खुद्द उद्धव ठाकरेंनी खुलासा केला आहे.

उद्धव ठाकरेंनी दिली माहिती..

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आणि परवा बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. जी लोकशाही प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे. ही लढाई व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून हुकूमशाही विरोधात आहे. पण जो पायंडा पडतो आहे ते देशासाठी घातक आहे, त्यासाठी सर्व लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र येत आघाडी मजबूत निर्माण झाली आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray meet Ajit Pawar first time After NCP Crisis with Aditya Thackeray political news
Monsoon Session : भास्कर जाधवांची अध्यक्षांबरोबर खडाजंगी; फडणवीस म्हणाले, "त्यांना केक खाऊ घाला"

अजित पवारांशी काय चर्चा झाली?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांने राज्यासाठी चांगले काम करावे, असे सांगितले. इथे सत्तेची साठमारी चालली आहे त्यामध्ये राज्याचे तसेच मुळ शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray meet Ajit Pawar first time After NCP Crisis with Aditya Thackeray political news
Mumbai Flood Update : पावसाचा कहर! बदलापूर येथे २०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. इथे बाकीच्यांचे सत्तेसाठी काहीही डावपेच चालले असले तरी त्यांच्याकडून जनतेला योग्य मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परत एकदा त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.