Uddhav Thackeray : फडणवीस सध्या 'नावडाबाई' झालेत, अर्धवटराव टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

Uddhav Thackeray :   देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धवटराव टीकेवर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या नावडाबाई झालेत असे, ठाकरे म्हणाले. नगरसेवकांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले मी फडणवीसांची एक क्लिप दाखवली आहे. महाराष्ट्रात भ्रम पसरवल्या जात आहे. मोदींनी लस तयार केसी नसती तर? मला नाही वाटत मोदी देखील असं कधी बोलले असतील. त्यावर देवेंद्र फडणवीस मला अर्धवटराव बोलले.

अर्धवटराव हे पहिलं पात्र कुणाचं? मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीस्वरांचे काय आवडाबाई आहेत का? त्यांची दोन पात्र होते एक अर्धवटराव आणि आवडाबाई आता ते पण दिसत नाहीत. आता ते नावडाबाई झाले आहेत.

Uddhav Thackeray
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराबाबत मोठी अपडेट! अयोध्येत प्राणप्रतिष्ठापनेची तारीख जाहीर

मोदींनी लस तयार केली या वाक्याला काही अर्थ आहे का? तुम्ही कोणत्या जगात राहत आहात लोकांना मूर्ख का समजता, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ दाखवत टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, काय माहिती. कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का? संशोधक गवत उपटत होते का? 

असे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू म्हणल्यानंतर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं ते ठरवावं लागेल. यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे'. यानंतर भाजपकडून त्यांच्या या वक्तव्यावरून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Uddhav Thackeray
BJP vs Shivsena : 27 जुलै 'आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन' म्हणून घोषित करा, भाजपची संयुक्त राष्ट्राकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.