हिंगोलीः हिंगोली येथील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेदरम्यान सुरुवातीला पाऊस आला. तरीही उपस्थितांनी गर्दी कमी केली नव्हती. यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सणसणीट टोमणा लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मी गद्दारांवर बोलण्यासाठी वेळ घालवणार नाही. गद्दारांना तुम्हीच धडा शिकवणार आहात. हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसोबत राहिलेली आहे. आता काही बेंडकुळ्या आहेत, परंतु त्यांच्यात केवळ हवा असून खरी ताकद माझ्याकडे आहे. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्यांना हिंदू म्हणायचं का? अशांचा उद्धटपणा आपल्याला गाडून टाकावा लागले.
शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न असताना सरकारला काही देणंघेणं नाहीये. 'सरकार आपल्या दारी.. थापा मारतंय भारी', अशीच अवस्था राज्यात सुरु असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच 'शासन आपल्या दारी योजना मात्र कागदावरी' असाही टोमणा त्यांनी लगावला.
ठाकरे पुढे बोलले की, भाजपमध्ये सगळे आता आयाराम आहेत. अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु ते फक्त सतरंज्या उचलण्यापुरते उरले आहेत. फडकतंय दुसरंच आणि निष्ठावानांच्या हाती दांडा उरला आहे. डबल इंजिन सरकारला आणखी एक अजितदादांचा डबा लागला आहे. तुमच्या पक्षात चांगले नेते नाहीत का? नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मतं मागण्याची हिंमत नाही? असा घणाघात त्यांनी केला.
''एनडीएचा आता अमिबा झाला आहे. ज्यावेळी आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत. तेव्हा आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनबरोबर करता. आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्याबरोबर असलेला शेतकरी अतिरेकी आहे का?'' असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी फडणवीसांना काही बोलणार नाही. कारण मी काही म्हटलं की त्याचा बोभाटा होतो. मी फडतूस बोललो होतो...पण आता नाही बोलणार. मागे एकदा कलंक बोललो होतो, पण आता बोलणार नाही. आता थापाड्या बोलणार होतो परंतु नाही बोलणार.. असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.
''राज्यात दुष्काळ पडलेला असताना फडणवीस जपानला गेले. तिकडे डॉक्टरेट घेतली आणि परत आले.. तुमचा हा प्रयत्न उत्तम आहे. परंतु तुमच्या सरकारमध्ये जे प्रकल्प जपानला गेले ते माघारी आणाल का? मोदीजी म्हणाले होते मोठा उद्योग देतो, कुठेय उद्योग?'' असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.