Uddhav Thackeray : मविआमध्ये तुम्ही आपापसांतच टीका करता? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, "ही तर आमची सवय..."

यानंतर शरद पवार आणि नाना पटोले हसू लागल्याचं पाहायला मिळालं.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal
Updated on

मुंबई : उद्या मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यानिमित्ताने तयारीच्या माहितीसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे उपस्थित होते. यावेळी 'आम्ही आपापसांतच टीका करतो ही आमची सवयच आहे' असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

भाजपला शह देण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक उद्या मुंबई येथे होणार आहे. महाविकास आघाडीने या बैठकीचे आयोजन केले आहे. महाविकास आघाडीकडून आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधण्यात आला. गॅस सिलिंडरचे भाव कमी झाले हे इंडिया आघाडीचे यश असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. उद्या आणि परवा होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भाजपने हा निर्णय घेतल्या दावा राऊतांनी केला आहे.

Uddhav Thackeray
Video : धक्कादायक! आरोपीला वाचवण्यासाठी इराणी नागरिकांची मुंबई पोलिसांवर दगडफेक; घटना CCTV मध्ये कैद

दरम्यान, महाविकास आघाडीत तुम्ही सामनाच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करत असता, ही विसंगती तुमच्यात दिसून येते असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमचं वैशिष्टच आहे की आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. भाजपसोबत होतो त्यावेळी भाजपवरही टीका करत होतो" असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. त्यांच्या उत्तरानंतर शरद पवार आणि नाना पटोले खळखळून हसले.

त्याचबरोबर शेतकरी नेते म्हणतात की उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं... या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "होहो मी जातो उद्या शपथ घेतो." असं विनोदी उत्तर ठाकरे यांनी दिल्यामुळे सभागृहात हशा पिकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.