Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी फेरनियुक्ती होणार! ठाकरे गटाने सुरू केली मोर्चेबांधणी

कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याची माहीती
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey Esakal
Updated on

शिवसेना पक्ष दोन गट दोन प्रमुख अनेक घडामोडी सध्या राज्यात सुरू आहेत. या संपूर्ण घडमोडींवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. अशातच आता सत्तासंघर्ष प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. येत्या १८ जूनला मुंबईत होणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत यासाठी ठाकरे गट पुढील रणनीती आखत आहे. यासाठी कायदेशीर सल्ला घेऊ ठाकरे गटाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Uddhav Thackrey
Sharad Pawar: आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत हालचाली सुरू; शरद पवारांनी दिले 'हे' आदेश

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा आज (१८ जूनला) मुंबईत होणार आहे. यात उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपल्यानंतर प्रथमच ही बैठक होत आहे.

Uddhav Thackrey
Trimbakeshwar Controversy: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, घेतला मोठा निर्णय

विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव, कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याचे माहीती 'साम टिव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Uddhav Thackrey
Radhakrishna VikhePatil on Ram Shinde : शिंदेंच्या तक्रारीवर विखेंचा सल्ला, ‘पक्षश्रेष्ठींसमोर शहानिशा करु’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.