CM स्वत:चं घर सोडून इतरांची घरे धुंडाळतात, शेतकरी वाऱ्यावर, भाजपवाले रेवडी उडवतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला.  राज्यात नियोजन शून्य विकासकामे सुरू आहेत. हे असंवैधानिक मुख्यमंत्री कृत्रिम पाऊस पाडणार होते. पण ते देखील त्यांना करता आले नाही.  मुंबईत प्रदूषण वाढत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. द्राक्ष आणि कांद्याचे नुकसान झाले. आधीच केंद्राच्या नाकर्ते धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला होता. आता कांदा गेला. मी मुख्यमंत्री होतो त्यामुळे मला काही गोष्टी माहित आहेत. सर्व माहिती जाग्यावर मिळते. मात्र सध्याचे मुख्यमंत्री स्वत:चं घर सोडून इतरांची घरे धुंडाळतात. आता देखील ते राज्यात नसून तेलंगणात गेले आहेत. ते तेलंगणात कुठल्या भाषेत बोलणार? सुरत, गुवाहाटी, गोवा हा चोरटेपणाचा प्रवास ते सांगणार आहेत का?

स्वत:चे घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. राज्य वाऱ्यावर आहे. एक फुल दोन हाफ, दोन हाफ कुठे आहेत याची तर काहीच कल्पना नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र मंत्रिमंडळाने काय केलं?. पिक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही, असे आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते. मात्र ते दिवाळीत काही दिसले नाहीत. त्यांनी कुठं फटाके फोडले त्यांना माहिती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray
Prakash Ambedkar: राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक वक्तव्य

राज्यात काही शेतकऱ्यांना २० रुपयाचे चेक मिळाले. यावर बोललं तर गद्दार गळा काढतात. ते (एकनाथ शिंदे) म्हणतात, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा, आम्हाला अभिमान आहे. मात्र या गरिब शेतकऱ्याची पंचतारांकित शेती आहे. ते शेतात हेलिकॉप्टरने जातात. मी तर म्हणतो अशी शेती आणि वैभव सर्व शेतकऱ्यांना मिळो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

ते म्हणाले,  इतर राज्यात निवडणुका असताना भाजपवाले रेवडी उडवतात. महाराष्ट्राने काय पाप केलं. पंतप्रधान क्रिकेटच्या फायनला जातात पण मणिपूरला जात नाहीत. आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना सगळ्यांना दमदाटी करायला वेळ आहे, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरवण्याला त्यांना वेळ नाही. 

Uddhav Thackeray
सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला दिलासा! NGT च्या 12 हजार कोटींच्या दंडावर स्थगिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.