लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला चांगलेच झोडपले आहे.
यामध्ये भाजप, पंतप्रधान मोदी आणि लोकसभा निवडणुकींच्या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील उद्योग धंदे पळवल्याने बेरोजगारी आणि बेकारी वाढली आहे. तुम्ही महाराष्ट्राचा घात का केलात? मोदी आज राज्यभर फिरत आहेत. मला वाटतं ते आता गल्ली-बोळातही रोड शो करतील. मला वाटते त्यांनी तो करावा. त्यांना महाराष्ट्र कसा आहे आणि महाराष्ट्रात किती संताप आहे याचा अनुभव घ्यावा. (Uddhav Thackeray Interview To Saamna With Sanjay Raut)
यावेळी उद्धव ठाकरे यांना, मोदी आणि शहा हे देशासह महाराष्ट्रातील सर्वकाही गुजरातला पळवत आहेत. अशा परिस्थितीत हे सर्व तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का असा प्रश्न करण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत कोणताही उद्योग धंदा गुजरातला नेण्याची त्यांची बिशाद नव्हती. पण नंतरी गद्दारीमुळे त्यांचे सरकार डबल इंजिन झाले. आणि त्यानंतर डबल इंजिनामुळे त्यांनी वेगाने उद्योग-धंदे पळवले."
याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले, "हे जे उद्योग-धंद्यांबाबत घडले आहे, तसेच बाढलेल्या बेरोजगारी आणि बेकारीमुळे जनतेमध्ये राग आहे. तुम्ही आमचा घात का केला? महाराष्ट्राचा घात का केला असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला."
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मोदी आज राज्यभर फिरत आहेत. मला वाटतं ते आता गल्ली-बोळातही एखादा रोड शो करतील. त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे पाहावा. महाराष्ट्राचा संताप आणि आक्रोश त्यांनी अनुभवावा. महाराष्ट्राचे प्रेम आणि आशीर्वाद मोदींना दहा वर्षे मिळाला. आता मोदीजींनी महाराष्ट्राचा शाप काय असतो हे अनुभवावे."
देशभरात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यातील तीन टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. तर 13 मे रोजी चौथ्या टप्प्यांतील जागांवर मतदान होणार आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत महाराष्ट्रात 13 सभा घेतल्या आहेत. तर पाचव्या टप्प्यांतील जागांसाठी मोदींच्या आणखी काही सभा राज्यात होणार आहेत. तर पंतप्रधानांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 9 सभा घेतल्या होत्या.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने याचा फटका भाजपसह महायुतीला बसण्याची शक्यता सातत्याने वर्तवली जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रचारसभा वाढवाव्या लागल्याची चर्चा सर्वत्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.