औरंगाबाद : बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिमांचा द्वेष करायचे कधी सांगितले नाही. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचं अस शिवसेना प्रमुखांना सांगितले आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. आज औरंगाबाद (Aurangabad) येथील शिवसेनेच्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. (Uddhav Thackeray Sabha Bahalasaheb Thackeray Not Teach Heating Muslim)
आज जवळपास सहा महिन्यानंतर मुंबई बाहेर पाऊल टाकले. आज संभाजीनगरमध्ये आलो आहे. आपण ८८ साली औरंगाबाद नगरपालिका जिंकली होती. एवढी वर्षी झाली तरी उत्साह तो आहे. मैदानच पुरत नाही. आता आपली ताकद वाढत आहे, असे ठाकरे म्हणाले. आई जगदंबाने शक्ती दिली आहे. ढेकण आम्ही असचं चिरडत असतो, अशी टीका त्यांनी भाजप केली. मी मुद्दामून औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर बोलणार आहे.
बाकीचे विषय महत्त्वाचे नाही. कुठेही फसवेगिरी नाही. मधे कोणीतर आक्रोश मोर्चा काढला. त्यांची सत्ता गेली म्हणून तो आक्रोश होता. पर्यटनासाठी जंगल सफारीचे काम सुरु केलं आहे. आपल्याकडे जी मेट्रो होईल ती शहराचे विद्रूपीकरण करणारी नसेल, ती औरंगाबादची शान वाढणारी असेल. सत्ता गेली की एकदम यांच्या अंगात येते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. आम्हाला चिंता कशीच तर ज्ञानपावी खाली काय आहे ?
आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. वारकरी, छत्रपतीचा भगवा आहे. एकीकडे हनुमान चालीसा म्हणायचे आणि दुसरीकडे शिव्या द्यायच्या. बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिमांचा द्वेष करायचे कधी सांगितले नाही. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचं, अस शिवसेना प्रमुखांना सांगितले. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्यामुळे देशाचा अपमान झाला आहे, असे ठाकरे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.