मुंबई : शिवसेनेची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. बाबरीच्या प्रकरणावरून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस तुम्ही जर खरंच तिकडे गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी खाली आली असती." अशी बोचरी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.
(CM Uddhav Thackeray On Devendra Fadnavis)
"हिंदुत्वासाठी तुम्ही काय केलंय? बाबरी तर पाडली नाहीच, ती आमच्या शिवसैनिकांनी पाडली हे आम्ही अभिमानाने सांगतो. तुम्ही म्हणता की आम्ही बाबरी पाडली, ती काय शाळेची सहल होती का? की चला चला चला बाबरी पाडायला चला... अरे तुमचं वय काय? बोलता काय?" असं म्हणत त्यांनी फडणवीसांना फटकारलं आहे.
यावेळी आपल्या भाषणात त्यांनी अडवाणींच्या मुलाखतीच्या व्हिडीओतील किस्सा सांगितला. "अडवाणी म्हणाले की, जी लोकं बाबरीवर चढली होती ती मराठी बोलंत होती, मग मराठी बोलणारी माणसं कोण असतीलं दुसरी?" असा सवाल करत पुढे म्हणाले की, "मला अजूनही तो दिवस आठवतोय, मी बातम्या पाहत होतो, बाबरी पडल्याची बातमी दिसली अन् मी पळत वर बाळासाहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं... साहेब बाबरी पाडली... त्यानंतर ते म्हणाले अरे व्वा... तेवढ्यात फोनची बेल वाजली आणि त्यांनी फोन घेतला. फोनवर ते फक्त रिप्लाय देत होते... पुढे ते म्हणाले, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे." असं म्हणत त्यांनी बाबरीचा किस्सा सांगितला.
"कारसेवा करा म्हणजे आयोध्येला येवून गाड्या धुवायच्या? हे असलं नेतृत्व कुचाट नेतृत्व आहे, आम्हाला काय माहीती तिकडे मंदीर पाडून मस्जिद बांधली म्हणून?" असं म्हणत त्यावेळच्या नेतृत्वावरही टीका त्यांनी केली.
"तुम्हाला उत्तर सभा घेऊन उत्तर द्यायचे असतील तर जनतेला द्या, आम्हाला देऊ नका, कारण जनता महागाईने होरपळलीये आणि तुम्ही डोक्यात भगव्या टोप्या घालून आम्हाला हिंदुत्व दाखवत असाल तर मग आरएसएस ची टोपी काळी का? असा सवाल करत आम्हाला हिंदुत्व शिकवू नका असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.