'कोकणाला (Konkan) शिवसैनिकांचा कोकण म्हणूनही ओळख आहे. कोकणाचं आणि शिवसेनेचं आतुट नातं आहे.'
खेड (रत्नागिरी) : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत आहे. खेडमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेला मुस्लिम मराठी सेवा संघानं पाठिंबा दिला आहे. ठाकरेंच्या या सभेमध्ये 25 हजार मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मुस्लिम सेवा संघाचे नेते फारूक ठाकूर यांनी दिलीये.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरुवात झाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केलीये. याआधी आपल्या भाषणात भास्करराव जाधव यांनीही निशाणा साधला.
अंधारे म्हणाल्या, 'कोकणाला (Konkan) शिवसैनिकांचा कोकण म्हणूनही ओळख आहे. कोकणाचं आणि शिवसेनेचं आतुट नातं आहे. या कोकणवासियांनी शिवसेनेला (Shiv Sena) भरभरुन दिलं आहे. आणि शिवसेनेनं देखील कोकणाला कायमचं झुकतं माप दिलं. याच कोकणानं विनायक राऊत, अनिल परब, वैभव नाईक यांच्यासारखे निष्ठावंत शिलेदार दिले आहेत.'
कोकणानं कायमच निष्ठावंत शिलेदार शिवसेनेला दिले, पण नियमाला अपवाद ठरत काही वटवृक्षावर वाढणारे बांडगुळंही आमच्यामध्ये सामील झाले. जी बांडगुळं सामिल झाली, ती शिवसेनेच्या बळावर वाढली. शिवसेनेनं त्यांना मोठा केलं. शिवसेनेमुळंच ते जगले, तगले, उभे राहिले. 1990-93 चा काळ त्या काळातील सगळी बांडगुळं मुंबई ते कोकण कसा प्रवास करायचे आणि 2023 मध्ये त्यांची संपत्तीकस्थिती काय आहे. असा कुठला खजाना त्यांना सापला होता. ते अचानक अरबपत्ती झाले? असा सवालही त्यांनी यानिमित्तानं उपस्थितीत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.