Maratha Andolan: '...म्हणून सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला'; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

LIVE Marathi News Updates
LIVE Marathi News UpdatesEsakal
Updated on

मुंबई- मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. मला माहिती मिळाली आहे, की तिकडे 'सरकारला आपल्या दारी थापा मारतं लय भारी' हा कार्यक्रम घ्यायचा होता. आंदोलन कर्त्यांना तेथून उठवायचं होतं. त्यामुळेच या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते युवा सेनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात येणार होता. त्यासाठी आंदोलनकर्त्यांना तेथून उठवायचं होतं. त्यामुळेच त्यांना उठा, उठा सांगण्यात आलं. आंदोलनकर्त्यांना त्यांच्या व्यथा सांगायच्या होत्या. कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. त्यातून पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर लाठीमार सुरु झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

LIVE Marathi News Updates
Maratha Morcha Protest: मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको; 'या' कारवाईचे जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटले

वृद्ध महिलांवर घरात शिरुन लाठीमार करण्यात आला. पोलिस इतके राक्षस होऊ शकतात का? सरकार म्हणतंय सखोल चौकशी करु. आणखी किती सखोल जाणार. आरक्षण म्हणजे लोकांना न्याय हवा आहे. सगळ्यांना समान न्याय द्या. कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत, असं ते म्हणाले.

गणपती 19 तारखेला येतायत. हे हिंदूत्ववादी सरकार आणि केंद्रात जगतगुरू बसलेले आहेत. याचं काय अडकलं आहे की खास अधिवेशन तिकडे त्यांना गणपती काळातच घ्यायचं आहे. अधिवेशनात भरपूर बोललात पण मणिपूरवर बोलत नाहीत. काल मी याचा निषेध केला होता. पण आज स्वागत करतो पण जे विषय प्रलंबित आहेत ते या अधिवेशनात वटहुकूम काढून न्याय द्या, असं ते म्हणाले.

LIVE Marathi News Updates
Maratha Reservation Protest: मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक? लाठीचार्जच्या निषेधात निर्णय

महागाई एवढी वाढलेली आहे की लोकांना काही देत नाहीत. जी हुकूमशाही आहे तिला चिरडून टाकायला इंडिया आघाडी आलीय. 2012 ला सुषमा स्वराज यांचा फोन आला होता, त्यावेळी त्या म्हणत होत्या की भारत बंद करायचं. पण जेव्हा बाळासाहेबांना सांगितलं तेव्हा ते म्हटले गणपती काळात शक्य नाही. कर्नाटकमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात होईल, असं ठाकरे म्हणाले.

दिलेले वचन त्यांनी जर पाळलं असतं तर आज हाफ ऐवजी फुल म्हणून ते पदावर बसले असते. आमच्या नेत्यांना त्रास दिला जातोय. किशोरी ताई, अनिल परब, संजय राऊत यांच्यावर कारवाई करता. आमच्या लोकांना धमक्या देता. सर्व ठीक आहे, तुमचे पण दिवस आतमध्ये जायचे येणार आहेत, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.