मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी केल्याचे वृत्त होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेली Z+ सुरक्षा काढून घेण्यात आली अशा बातम्या झळकल्या होत्या.
तसेच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील अतिरिक्त वाहने आणि मातोश्रीबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र गृह विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कमी केली नसल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.