उद्धव ठाकरे पवारांना म्हणाले, महापालिका न जिंकलेला माणूस मुख्यमंत्री?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sakal
Updated on

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस. गेल्या दीड दोन महिन्यांचा काळ म्हणजे त्यांच्या साठी राजकीय परीक्षेचाच म्हटला पाहिजे. त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी एकनाथ शिंदे यांनी मागच्या महिन्यात बंड पुकारले. शिवसेना समर्थक असलेल्या तब्बल 50 आमदार त्यांनी फोडून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हिसकावून घेतली. मुळात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार हाच एक चमत्कार मानला गेला होता.

Uddhav Thackeray
Long Covid Symptoms : केस गळती, लैंगिक समस्या लाँग कोविडची आहेत ही 62 लक्षणं : स्टडी

गेल्या निवडणुकीवेळी भाजप बरोबर युती करून विजयी झालेले उद्धव ठाकरे ऐनवेळी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा म्हणून युतीमधून बाहेर पडले होते. सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर अनैसर्गिक मानली जाणारी आघाडी त्यांनी केली. तेव्हाच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा अशी चर्चा सुरू झाली होती, पण अखेरीस ती माळ उद्धव ठाकरेंच्याच गळ्यात पडली. ही सगळ घडण्यामागे देखील शरद पवारच होते अस मानल जात. खुद्द उद्धव ठाकरे यांनी याबद्दलचा किस्सा एका मुलाखती मध्ये सांगितला आहे.  

Uddhav Thackeray
शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

गोष्ट आहे 2019 सालच्या निवडणुकीनंतरची. भाजप-शिवसेना यांच्यातील बोलणी फिसकटली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा देखील प्रयोग फसला होता. शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरू होती. खुद्द शरद पवार भेटण्यासाठी आले होते. उद्धव ठाकरे सांगतात, शरद पवारांसोबत तिन्ही पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीत आमचं सगळं ठरलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं उद्धवजी एक मिनीट बोलायचंय. बाजूला खोलीत गेल्यानंतर ते म्हणाले उद्धवजी, हे सगळं ठीक आहे. पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हटलं का? ते म्हणाले आमच्याकडे आणि काँग्रेसकडे ज्येष्ठ लोक आहेत. पण शिवसेनेकडून तुम्ही नसाल तर ते पुढे चालणं कठीण आहे.

मी म्हटलं पवारसाहेब, मस्करी करताय का? मी महापालिकेत महापौर जिंकल्यानंतर फक्त अभिनंदन करायला जातो. म्हटलं साधा महापालिका न जिंकलेला माणूस मुख्यमंत्री कसा होईल? ते म्हणाले, नाही, हे तुम्हाला करावं लागले. मग केली जिद्द. मग शरद पवार, सोनिया गांधींनी माझ्यावर विश्वास टाकला”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray
'बाळासाहेब ठाकरे एक विचार आहे कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही'

मुलाखतींमधून केला ठाकरेंनी खुलासा

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदा उद्धव  ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून अनेक गोष्टींचा खूलासा केला आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरातून कधीही बाहेर पडत नव्हते, असा आरोप सातत्याने केला जायचा. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? कारण त्यावेळेला ती परिस्थितीच तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि ते लोक ऐकत होते. मी जर का तेव्हा घराबाहेर पडलो असतो किंवा आजही पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच. म्हणजे मग काय झालं असतं की, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असे झाले असते.

Uddhav Thackeray
बाळासाहेबांची 56 वर्षाची शिवसेना नष्ट करण्याचा 'दिल्ली'चा डाव - संजय राऊत

तर उठाव झाला असता

महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेने उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱयाला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानाने सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱयांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं. असही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()