Uddhav Thackeray : ''पाकिस्तानी क्रिकेटर्सवर भाजप फुलांचा वर्षाव करत असेल तर...'', उद्धव ठाकरे थेट बोलले

uddhav thackeray on bjp
uddhav thackeray on bjpesakal
Updated on

मुंबईः उद्धव ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची युती झाली आहे. वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक रविवारी संपन्न झाली.

समाजवादीसह वेगवेगळ्या २१ पक्षांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे गटाने पुढची रणनीती आखली आहे. शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेची पहिली निवडणूक १९६८मध्ये प्रजा समाजवादी पक्षाशी युती करुन लढली होती. १९७३ मध्ये महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाच्या रा.सू. गवई गटाशी आघाडी केली होती.

आता शिवसेना (उद्धव ठाकरे गट) समाजवादी पक्षासोबत जात आहे. या संयुक्त बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला सणसणती उत्तर दिलं. राज्यातले भाजप, शिवसेना नेते आणि केद्रातल्या भाजप नेत्यांवर त्यांनी आसूड ओढला.

uddhav thackeray on bjp
Samruddhi Mahamarg Accident: 'समृध्दी'वरील अपघात प्रकरणी CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जसा आहे तसा आहे, स्वीकारा अथवा नाकारा. आज २१ पेक्षा जास्त पक्ष माझ्यासोबत आले हे भाग्य आहे. लढाई ही विचारांशी असते व्यक्तींशी नसते. त्यामुळे आपल्याला विचारांचा लढा पुढे न्यायचा आहे.

''आजही मला लाडके माजी मुख्यमंत्री म्हणतात, मला कुटुंबप्रमुख असल्याचा आनंद वाटतोय. समाजवादीसोबत आम्ही आलो आहोत तर तिकडचे लोक असं झालं, तसं झालं म्हणतील. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी क्रिकेटवर फुलांचा वर्षाव भाजप करत असेल तर शिवसेना म्हणून मी समाजवाद्यांशी का बोलू शकत नाही?''

uddhav thackeray on bjp
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर अमोल कोल्हेंनी शेअर केला जुना व्हिडिओ, म्हणाले...

ठाकरे पुढे म्हणाले, समाजवादीतले लोक काय देशाबाहेरुन आले आहेत का? आमचे मतभेद होते, ते आम्ही गाडून टाकले आहेत, तुम्हाला काय करायचंय? देशावर प्रेम करणारे मुस्लिम सोबत आले तर पोटात दुखण्याचं कारण काय? असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.