Uddhav Thackeray : 'हिंदूत्व हे थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा

uddhav thackeray slam bjp eknath shinde  balasaheb thackerays birth anniversary maharashtra politics
uddhav thackeray slam bjp eknath shinde balasaheb thackerays birth anniversary maharashtra politics
Updated on

मुंबई : शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांचं हिंदूत्व म्हणजे थोतांड असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धुक्याची एक भिंत उभी करायची आणि त्याच्या आडून देशावर पोलादी पकड घट्ट बसावायची. अशी बसवायची कि तुम्ही हूंकी चूं केलं तर याद राखा.

uddhav thackeray slam bjp eknath shinde  balasaheb thackerays birth anniversary maharashtra politics
Ajit Pawar : 'त्यांना डायपर घातले पाहिजे...'; हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर अर्वाच्च भाषेत हल्ला

यावेळी उद्धव ठाकरे यांनी चीनचं उदाहरण देखील दिलं. ते म्हणाले की, काही वर्षापूर्वी मी चीनला गेलो होतो. तेथे तेव्हा अशी परिस्थिती होती की बीजिंगमध्ये जर अनावधानाने सुध्दा कोणी सरकारविरोधात बोललं तरी दोन दिवसात तो माणूस अदृश्य होतो. म्हणजे ती पोलादी पकड काय असेल? तशी घाणेरडी पोलादी पकड इकडे आणायला बघत आहेत. ते आपण उघड्या डोळ्याने बघत बसायचं असे उद्धव ठाकरे म्हणाले.

uddhav thackeray slam bjp eknath shinde  balasaheb thackerays birth anniversary maharashtra politics
Rahul Gandhi : लग्न कधी करणार ते पहिला पगार किती मिळाला? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.